advertisement

"अजितदादांचा दशक्रिया विधी होणार नाही", सख्ख्या भावाने दिली माहिती, कारणही सांगितलं

Last Updated:

Ajit Pawar Plane Crash: महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतरच्या धार्मिक विधींबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे.

News18
News18
महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतरच्या धार्मिक विधींबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. अजित पवार यांचा 'दशक्रिया विधी' होणार नाही, असं त्यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी स्पष्ट केलं आहे. अस्थि विसर्जनाच्या दिवशीच सर्व धार्मिक विधी पार पाडण्यात आले असल्याने, आता यापुढे कोणताही वेगळा विधी केला जाणार नसल्याचं कुटुंबियांकडून सांगण्यात आलं आहे.

अस्थि विसर्जनासोबतच सर्व विधी पूर्ण

अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडालेला असताना, त्यांच्या उत्तरकार्याबाबत विविध चर्चा सुरू होत्या. ६ फेब्रुवारी रोजी त्यांचा दहावा दिवस (दशक्रिया विधी) होता. मात्र, श्रीनिवास पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबियांनी अस्थि विसर्जनाच्या वेळीच आवश्यक ते सर्व विधी पूर्ण केले आहेत. त्यामुळे आता १० व्या किंवा १३ व्या दिवसाचा कोणताही सार्वजनिक किंवा धार्मिक विधी आयोजित केला जाणार नाही.
advertisement
या सगळ्यावर अजित पवारांच्या कुटुंबीयांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नाही. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार किंवा जय पवार यांनी याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. श्रीनिवास पवारांनी पवार कुटुंबीयांशी चर्चा करूनच ही माहिती दिल्याचं आता सांगण्यात आहे.
खरं तर, सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा पेच निर्माण झाला आहे. अजित पवारानंतर हे पद कुणाला द्यायचं, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. अलीकडेच प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र त्यांनी ही माहिती फेटाळून लावली आहे. सुनेत्रा पवारांकडेच पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद द्यावं, अशी मागणी पक्षातील आमदार पदाधिकारी आणि कार्यकर्ते करत आहेत. एकीकडे राष्ट्रीय अध्यक्षपदाचा पेच सुरू असताना अजित पवारांचा दशक्रिया विधी होणार नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या दोन्ही घटनांना आता एकमेकांशी जोडलं जात आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
"अजितदादांचा दशक्रिया विधी होणार नाही", सख्ख्या भावाने दिली माहिती, कारणही सांगितलं
Next Article
advertisement
NCP Merger: अजितदादांनी सगळं ठरवलं होतं, कोण होणार होतं राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यात कोणाचा चेहरा? फॉर्म्युला आला समोर
अजितदादांनी सगळं ठरवलं होतं, कोण होणार होतं राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यात कोणाचा चे
  • गील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणांच्या चर

  • राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या पडद्याआड झालेल्या बैठकांची माहिती समोर येऊ लागली

  • विलीनीकरणातील राष्ट्रवादीतील सत्ता वाटपाचं सूत्र निश्चित करण्यात आल्याची माहिती

View All
advertisement