कारमधून अपहर, बेदम मारहाण करत रस्त्यावर फेकलं, सिंधुदुर्गला हादरवणारं प्रकरण निघालं बनावट
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ शहरात एक विचित्र प्रकार समोर आला आहे. येथील एका तरुणाने घरभाडे न दिल्याच्या कारणातून अपहरण करून मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला होता.
भरत केसरकर, प्रतिनिधी सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ शहरात एक विचित्र प्रकार समोर आला आहे. येथील एका तरुणाने घरभाडे न दिल्याच्या कारणातून अपहरण करून मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला होता. तरुणाला अशाप्रकारे मारहाण केल्याने शहरात खळबळ उडाली होती. पण आता हा सगळा प्रकार बनावट असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी अत्यंत गुप्त पद्धतीने तपास करत हे प्रकरण उघडकीस आणलं आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठी खळबळ उडवणारं सिद्धेश गावडे अपहरण आणि मारहाण प्रकरण हे पूर्णपणे बनाव असल्याचे उघड झाले आहे. निवती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भिमसेन गायकवाड यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून सत्य समोर आणलं. त्यांच्या तपासातून सिद्धेश गावडे या युवकाने स्वतःच खोटा बनाव रचल्याचे स्पष्ट झाले असून, या बनावट नाट्याचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे.
advertisement
या घटनेची सुरुवात भाडे देण्याच्या वादातून झाली होती. कुडाळ शहरातील एका फ्लॅटचे भाडे दिले नसल्याने ॲड. किशोर वरक यांना सिद्धेश गावडे यांनी विचारणा केली होती. त्यानंतर गावडे याने रागातून पोलिसांत फिर्याद दाखल करत ॲड. किशोर वरक, झोरे आणि गवस या तिघांवर गंभीर आरोप केले. त्याने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले होते की, भाड्याचे पैसे मागितल्याचा राग धरून या तिघांनी त्याचे अपहरण करून कारमध्ये बसवले. वाटेत मारहाण केली आणि बांदा परिसरात टाकून दिले. या फिर्यादीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला.
advertisement
सिद्धेशच्या समर्थनार्थ स्थानिकांची पोलिसांकडे धाव
ही घटना उघडकीस आल्यानंतर गावडेच्या समर्थनार्थ स्थानिक ग्रामस्थ पुढे सरसावले होते. त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली होती. संबंधितांवर कारवाईची मागणी केली होती. त्याचबरोबर ॲड. असीम सरोदे यांनीही पोलिस यंत्रणेवर आरोप करत निषेध व्यक्त केला होता. यामुळे सिंधुदुर्गात हे प्रकरण चांगलंच चर्चेत होतं.
यानंतर निवती पोलीस निरीक्षक भिमसेन गायकवाड यांनी या प्रकरणाचा तपास अत्यंत बारकाईने सुरू ठेवला. त्यांनी सिद्धेश गावडेच्या हालचालींचा मागोवा घेतला आणि घटनेच्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्या दिवशी गावडे बांदा बसस्थानक आणि गोव्यातील बसस्थानकात दिसून आला. हे फुटेज पोलिसांच्या हाती लागले. यावरून त्याच्या फिर्यादीतील सर्व गोष्टींवर संशय निर्माण झाला.
advertisement
सिद्धेश गावडेने बनाव रचल्याचं केलं कबूल
पोलिसांनी सिद्धेश गावडे याला चौकशीसाठी बोलावून घेतले असता, त्याने अखेर गुन्हा बनावट असल्याचं कबूल केलं. त्यानेच स्वतःचं अपहरण आणि मारहाण झाल्याची बनावट कथा तयार करून पोलिसांना चुकीची फिर्याद दिली होती. तपासात ही बाब सिद्ध झाल्यानंतर ॲड. किशोर वरक आणि त्यांच्या सहकाऱ्यांवरील सर्व आरोप खोटे ठरले. या प्रकरणात पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे रद्दबातल ठरले आहेत.
advertisement
सिद्धेश गावडेवर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार- ॲड किशोर वरक
या घटनेनंतर ॲड. किशोर वरक यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “आपल्यावर नाहक गुन्हे दाखल करण्यात आले होते, मात्र अखेर सत्य बाहेर आलं आणि मला न्याय मिळाला.” त्यांनी या प्रकरणात सशर्त जामीन मिळाल्याचीही माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, हा सर्व प्रकार त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवण्यासाठी रचण्यात आला होता. ॲड.किशोर वरक म्हणाले की आपण त्याला भाडे देणे लागत नव्हतो. कारण त्याच्यात आणि आपल्यामध्ये भाडे करार झाला नव्हता. पण आपण त्याला साहित्य वापरायला दिले होते. उलट त्याने माझा साहित्याचा अपहार केला होता. म्हणून आपण फौजदारी पात्र न्यासभंग आणि फसवणुकीची कुडाळ पोलीस ठाणे येथे तक्रार दिली होती. त्यामुळे त्याने हा बनाव रचला होता. अपहरण नाट्य करण्यामागे सिद्धेश गावडे याला मी दिलेले साहित्य परत द्यायचे नव्हते. आणि याच कारणाने त्याने हा बनाव रचला होता, अशी प्रतिक्रिया वरक यांनी दिली.
view commentsLocation :
Sindhudurg,Maharashtra
First Published :
November 08, 2025 11:46 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कारमधून अपहर, बेदम मारहाण करत रस्त्यावर फेकलं, सिंधुदुर्गला हादरवणारं प्रकरण निघालं बनावट


