Snake Bite: साप चावल्यानंतर काय करावे? काय करू नये; अशाप्रकारे वाचवा जीव
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:GEETA PANDHARINATH GAIKAR
Last Updated:
Snake Bite: ठाणे जिल्ह्यातील सर्प रक्षक प्रवीण भालेराव गेले 10 वर्षांपासून ते वेगवेगळ्या जातीच्या सापांना पकडून त्यांच्या निवाऱ्याच्या सुरक्षित जागी सोडून देतात. ठाणे जिल्ह्यात आढळणाऱ्या प्रमुख सापांमध्ये 'बिग फोर' या धोकादायक सापांचा समावेश आहे.
ठाणे जिल्ह्यातील सर्प रक्षक प्रवीण भालेराव गेले 10 वर्षांपासून ते वेगवेगळ्या जातीच्या सापांना पकडून त्यांच्या निवाऱ्याच्या सुरक्षित जागी सोडून देतात. ठाणे जिल्ह्यात आढळणाऱ्या प्रमुख सापांमध्ये 'बिग फोर' या धोकादायक सापांचा समावेश आहे. रसेलचा वाइपर (घोणस), भारतीय कोब्रा (नाग), सॉ- स्केल्ड वाइपर (फुर्सा), आणि सामान्य क्रेट (मन्यार/कानदार). तसेच, अजगर, धामण, तस्कर, गवत्या, वाळा सर्प, पाणसाप, हरणटोळ आणि दिवड यांसारखे बिनविषारी साप देखील या जिल्ह्यात आढळतात.
प्रवीण भालेराव यांनी साप हा सहज चावत नाही तर त्याची कारणे व्हिडिओच्या माध्यमातून समोर आणली आहेत. तसेच लोकांमध्ये सापाबद्दलची असणारी चुकीची समज किंवा साप चावल्यावर गावठी घरगुती उपचार हा 3 मिनिटांच्या आता करावे. ताबडतोब साप चावलेली जागा साबण आणि स्वच्छ पाण्याने धुवावी. साप चावलेल्या जागेपासून अर्धा इंच वर एक घट्ट दोरी किंवा कापडाने बांधा. जेणेकरून विष रक्तात जास्त जाऊ नये. हात किंवा पाय हृदयाच्या वर ठेवण्याचा प्रयत्न करा. साप चावल्यानंतर, रुग्णाला ताबडतोब डॉक्टरकडे घेऊन जा.
advertisement
साप चावल्यानंतर रुग्णाने जास्त हालचाल करणे टाळावे. हृदयाचे ठोके वाढल्यामुळे रक्ताभिसरण वाढते. जर रक्ताभिसरण वाढले तर रक्तात विष वेगाने पसरण्याचा धोका असतो. नाहीतर ताबडतोब वैद्यकीय मदत घ्यावी, चावलेल्या व्यक्तीला शांत ठेवा आणि चावलेला भाग हृदयाच्या पातळीखाली ठेवून शक्य तितका स्थिर ठेवावे. अंगठ्या, घट्ट कपडे किंवा इतर दागिने काढून टाका, तसेच चावलेल्या जागी कापू नका, चोळू नका किंवा दाब पट्टी लावू नका. या सर्व गोष्टी केल्यास सापाच विष ताबडतोब रक्तातात मिसळून जातो याने चावलेला व्यक्ती रिस्पॉन्स देण्यास नकार देतो. त्यामुळे जीव जाण्याच्या घटना जास्त घडतात.
advertisement
साप पकडणे हे धोकादायक काम असल्याने, चुकीची माहिती आणि चुकीच्या पद्धती वापरणाऱ्या 'स्वयंघोषित सर्पमित्रां'पासून सावध राहावे. साप पकडण्यासाठी योग्य तंत्रज्ञानाचा वापर करणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून साप आणि माणूस दोघांनाही इजा होणार नाही. घरात साप दिसल्यास घाबरण्याऐवजी प्रशिक्षित सर्पमित्राला किंवा वनविभागाला बोलावावे.
view commentsLocation :
Thane,Maharashtra
First Published :
October 15, 2025 5:02 PM IST