Solapur Accident; वडिलांचे अंत्यसंस्कार करून परतताना मुलाचा अपघाती मृत्यू; कारचा चेंदामेंदा, 4 जण जखमी

Last Updated:

कुर्डूवाडी वरून येत असताना वरकुटेजवळ कार आली असता रस्त्याच्या कडेला असलेल्या एका लिंबाच्या झाडावर जाऊन आदळली.

Solapur Accident News
Solapur Accident News
विरेंद्र उत्पात, प्रतिनिधी
सोलापूर :  कर्नाटक येथील बंगळूरुमध्ये रेल्वेमधून पडून झालेल्या अपघातामध्ये वडिलांचा मृत्यू नंतरचा विधी उरकून परत गुजरातकडे येत असताना झालेल्या रस्ते अपघातात मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हर्षद झंकार योगी (वय 35) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे . हा अपघात करमाळा कुर्डूवाडी रस्त्यावरील वरकुटे गावाजवळ पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास झाला आहे. या अपघातात चार जण जखमी झाले असून दोघाची प्रकृती चिंताजनक आहे
advertisement
या अपघातात दिनेश हिरा नाथयोगी (वय 40) , कृष्णा गोरबहादूर कुवर (वय 50), पुष्कर झंकर योगी (वय 30) तिघेही राहणार वापी (गुजरात) आणि निशा हर्षद योगी (वय 35) रा बंगळूर (कर्नाटक) असे जखमी झालेल्यांची नावे आहेत. याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, गुजरात येथील एक नेपाळी कुटुंब हे बंगळूरु कर्नाटक येथे रेल्वेतून पडून झालेल्या अपघातातील झंकर योगी यांचा मृत्यू नंतरचा विधी करायला गुजरातवरून बंगळूरु येथे (वाहन क्रमांक जी जे सी पी १६०३) गेले होते.
advertisement

जखमींवर खाजगी दवाखान्यात उपचार

वडिलांचा अंत्यविधी उरकून ते परत गावी गुजरातकडे निघाले होते. यावेळी कुर्डूवाडी वरून येत असताना वरकुटेजवळ कार आली असता रस्त्याच्या कडेला असलेल्या एका लिंबाच्या झाडावर जाऊन आदळली. यामध्ये एक जणाचा जागीच मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले. याची खबर पोलिसांच्या 112 क्रमांकावर करण्यात आली. यावेळी मेजर आनंद पवार, हवालदार आप्पा लोहार, सतीश इंगोले, व माजी सैनिक ॲम्बुलन्स चालक साजिद शेख यांनी तातडीने अपघात स्थळी धाव घेतली. तेथील मयत व जखमींना बाहेर काढून त्यांना करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये दोन गंभीर जखमींना खाजगी दवाखान्यात उपचार करण्यात आले. इतरांवर उपजिल्हा रुग्णालयातच उपचार चालू आहेत.
advertisement

करमाळा पोलिसांमध्ये अपघाताचा गुन्हा दाखल

यामध्ये या कुटुंबाकडे झालेल्या अपघातामध्ये कोणीही नातेवाईक व्यवस्थित नसल्याने माजी सैनिक ॲम्बुलन्स चालक साजिद शेख यांनी त्यांची सर्व सुश्रुषा केली.याबाबत करमाळा पोलिसांमध्ये अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत माने हे करीत आहेत.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Solapur Accident; वडिलांचे अंत्यसंस्कार करून परतताना मुलाचा अपघाती मृत्यू; कारचा चेंदामेंदा, 4 जण जखमी
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement