भारताविरुद्ध लाज गेली, आता UAE विरुद्ध खेळायला नकार, पाकिस्तानचं ग्रुप स्टेजलाच पॅक अप!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आशिया कपमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलन न केल्यामुळे सुरू झालेला वाद आणखी चिघळला आहे.
दुबई : आशिया कपमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलन न केल्यामुळे सुरू झालेला वाद आणखी चिघळला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीकडे भारतीय टीम तसंच मॅच रेफरी ऍन्डी पायक्रॉफ्ट यांचा निषेध नोंदवला, त्यानंतर आता पीसीबीने ऍन्डी पायक्रॉफ्ट यांना हटवण्याची मागणी केली आहे.
पीसीबीने आयसीसीकडे मॅच रेफरींनी आयसीसीच्या आचारसंहिता आणि क्रिकेटच्या भावनेशी संबंधित एमसीसी कायद्यांचे उल्लंघन केल्याबद्दल तक्रार दाखल केली आहे. पीसीबीने आशिया कपमधून मॅच रेफ्रींना तात्काळ काढून टाकण्याची मागणी केली आहे, अशी माहिती पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून लिहिली आहे.
पायक्रॉफ्ट यांनी एका टीमची बाजू घेतली, असा आरोप पीसीबीने केला आहे. मॅच रेफरी म्हणून पायक्रॉफ्ट कर्णधारांना हस्तांदोलन न करण्याचे निर्देश देऊ शकत नव्हते, असं पीसीबीचं म्हणणं आहे.
advertisement
तर युएईविरुद्ध खेळणार नाही
दरम्यान पायक्रॉफ्ट यांना हटवलं नाही, तर 17 सप्टेंबरला होणारा युएईविरुद्धचा सामना पाकिस्तान खेळणार नाही, अशी धमकीही पीसीबीने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पायक्रॉफ्ट हे पाकिस्तान-यूएई सामन्यासाठीही मॅच रेफरी आहेत. पीसीबीने त्यांच्या पत्रात हा मुद्दा नमूद केला आहे. मोहसीन नक्वी हे आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्षही आहेत.
पाकिस्तान आशिया कपमधूनच बाहेर?
advertisement
पाकिस्तानने जर युएईविरुद्ध खेळायला नकार दिला तर त्यांचं आशिया कपमधील आव्हान ग्रुप स्टेजलाच संपुष्टात येईल. युएईने ओमानचा पराभव केला आहे, तसंच पाकिस्तानने युएईविरुद्ध खेळायला नकार दिला, तर या सामन्याचे पॉईंट्सही युएईला मिळतील, त्यामुळे युएईच्या खात्यामध्ये 4 पॉईंट्स होतील. पाकिस्तानकडे मात्र 2 पॉईंट्सच राहतील, या परिस्थितीमध्ये भारत आणि युएई सुपर-4 मध्ये प्रवेश करतील.
advertisement
मोहसीन नक्वी यांनी नाव न घेता भारतीय टीमवरही निशाणा साधला आहे. 'खिलाडूवृत्तीचा अभाव पाहून निराश झालो. खेळात राजकारण ओढणे हे खिलाडूवृत्तीचा विरोधात आहे. भविष्यातील विजय सर्व टीमनी सन्मानाने साजरे करावेत, अशी अपेक्षा आहे', असं मोहसीन नक्वी म्हणाले आहेत.
पायक्रॉफ्ट हे 2009 पासून आयसीसी एलिट पॅनलमध्ये असलेले सगळ्यात अनुभवी मॅच रेफरींपैकी एक आहेत. पायक्रॉफ्ट यांना नामांकित करण्यासोबतच, आयसीसीने आशिया कपसाठी वेस्ट इंडिजचे रिची रिचर्डसन यांचे नावही पुढे पाठवले होते. एलिट पॅनलमध्ये सध्या तीन इतर मॅच रेफरी आहेत. यामध्ये भारताचे जवागल श्रीनाथ, न्यूझीलंडचे जेफ क्रो आणि श्रीलंकेचे रंजन मदुगले यांचा समावेश आहे.
advertisement
सोमवारी रात्री, पाकिस्तान टीम मॅनेजमेंटने भारतीय खेळाडूंच्या वर्तनाविरुद्ध पायक्रॉफ्ट यांच्याकडे निषेध नोंदवला. भारतीय खेळाडूंचं वर्तन निषेधार्ह आणि खेळ भावनेच्या विरोधात आहे, त्यामुळे आम्ही आमच्या कर्णधाराला मॅचनंतरच्या समारंभाला पाठवलं नाही, अशी प्रतिक्रिया पाकिस्तान टीमचे मॅनेजर नवीद चीमा यांनी दिली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 15, 2025 9:08 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
भारताविरुद्ध लाज गेली, आता UAE विरुद्ध खेळायला नकार, पाकिस्तानचं ग्रुप स्टेजलाच पॅक अप!