Bialpola Festival: शिंगं रंगणार, घुंगरं वाजणार...बैलपोळा सणासाठी फुलली बाजारपेठ
- Reported by:Patel Irfan Hassan
- Published by:Vrushali Kedar
Last Updated:
Bialpola Festival: बैलपोळा हा महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो. दर्श पिठोरी अमावस्येच्या दिवशी बैलपोळा सण साजरा केला गेला.
सोलापूर: वर्षभर शेतात राबराब राबणाऱ्या बैलांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे बैलपोळा हा सण. बैलपोळा हा महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो. दर्श पिठोरी अमावस्येच्या दिवशी बैलपोळा सण साजरा केला गेला. यावर्षी 22 ऑगस्ट रोजी बैलपोळा आहे. त्यामुळे पोळ्याचं साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची बाजारात लगबग सुरू झाली आहे. यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी आपल्या बैलांना सजवून आनंद व्यक्त करणार आहेत.
बैलपोळा सणानिमित्त सोलापूरमधील बाजारपेठ रंगबेरंगी साहित्यांनी सजली आहे. मोहोळ तालुक्यामध्ये देखील आठवडी बाजारांमध्ये व दुकानात बैलांच्या सजावटीचं साहित्य विक्रीसाठी आणलं आहे. इंगुळ, कासर, कवडी माळ, तोडे आधी साहित्याने दुकानं सजली आहेत.
पोळ्याच्या दिवशी बैलांना आंघोळ घालून त्यांची शिंगे रंगवली जातात. त्यांच्या अंगावर झूल टाकली जाते. त्यांच्या पायात तोडे आणि गळ्यामध्ये घुंगरांची माळ घातली जाते. बैलांना सजवल्यानंतर त्यांची गावातून मिरवणूक निघते. शेतात राबणारे बैल हे बळीराजासाठी फार महत्त्वाचे असतात. ते आपल्या मालकाच्या बरोबरीने कष्ट करतात. म्हणून शेतकरी देखील पोळ्याच्या दिवशी बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करतात.
advertisement
सोलापूरमधील व्यावसायिक दीपक माने यांनी लोकल 18शी बोलताना सांगितलं की, बळीराजा आपल्या लाडक्या बैलांना सजवण्यासाठी बाजारपेठमध्ये साहित्य खरेदीसाठी गर्दी करत आहे. बैलपोळा सणानिमित्त आठवडाभरामध्ये बाजारात पाच ते सहा लाख रुपयांपर्यंत आर्थिक उलाढाल होऊ शकते.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Aug 18, 2025 4:05 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Bialpola Festival: शिंगं रंगणार, घुंगरं वाजणार...बैलपोळा सणासाठी फुलली बाजारपेठ






