आधुनिक यांत्रिकीकरणाचा फटका, केरसुणीचा पारंपारिक व्यवसाय डबघाईस, सोलापुरात नेमकी काय परिस्थिती?

Last Updated:

विशेष म्हणजे केरसुणीला लक्ष्मी पुजनाच्या वेळी फारच महत्त्व असते. मात्र, आधुनिक यांत्रिकीकरणाच्या जगात केरसुणीरुपी लक्ष्मी लोप पावत चालली आहे.

+
सोलापूर

सोलापूर स्पेशल स्टोरी

इरफान पटेल, प्रतिनिधी
सोलापूर : देशाला स्वातंत्र्य मिळण्या अगोदरपासून ते भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर केरसुणीला ग्रामीण भागात लक्ष्मीचे स्थान आहे. खेड्यापाड्यात प्रत्येकाच्या घरात तिला लक्ष्मी असे म्हटले जाते. धनदौलत, पैसा, संपत्ती याप्रमाणे केरसुणीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
विशेष म्हणजे केरसुणीला लक्ष्मी पुजनाच्या वेळी फारच महत्त्व असते. मात्र, आधुनिक यांत्रिकीकरणाच्या जगात केरसुणीरुपी लक्ष्मी लोप पावत चालली आहे. मात्र, मोहोळ तालुक्यातील मौजे हराळवाडी हे गाव याला अपवाद आहे. याचे मुख्य कारण म्हणजे गावातील सुनिता कांबळे व त्यांचे पती दुर्योधन कांबळे या दोघांनी केरसुणी तयार करतात आणि आपल्या कामाच्या माध्यमातून हा व्यवसाय जिवंत ठेवण्याचे काम त्यांनी केले आहे.
advertisement
केरसुणी व्यवसाय हा त्यांचा पिढ्यानपिढ्या चालत आलेला व्यवसाय आहे. मात्र, यांत्रिकीकरणांमध्ये केरसुणीला अनेक पर्यायी साधने उपलब्ध झाल्यामुळे केरसुणी आता शेवटच्या घटका मोजत असल्याचे चित्र आहे. पण काही प्रमाणात आजही ग्रामीण भागामध्ये केरसुणीचा वापर होत आहे. केरसुणी तयार करण्यासाठी आवश्यक असणारा कच्चा माल म्हणजे शेंदुळीची झाडे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बागायतीकरण आणि जमिनीचे तुकडीकरण झाल्यामुळे नष्ट झाली आहेत.
advertisement
दादरमध्ये याठिकाणी मिळतं अगदी घरगुती जेवण, शुद्ध तुपातले मोदक अन् पुरणपोळीची चवही चाखता येणार!
अशा परिस्थितीत केरसुणी करण्यासाठी आवश्यक असणारा कच्चा माल आता ग्रामीण भागातही उपलब्ध होत नाही. पण कांबळे कुटुंब हराळवाडी परिसरातील आसपासच्या भागातून शेंदुळीचे पाने गोळा करून केरसुणी तयार करण्याचे काम करीत आहेत. पहिल्यासारखी केरसुणीची मागणी आता राहिली नाही. तसेच त्यासाठी लागणारा कच्चा मालाच्या किमती वाढल्याने केरसुणी तयार करणे आणि विकणे आता परवडत नाही. पण ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी व हाताला काम नसल्याने कांबळे कुटुंब आपला परंपरागत व्यवसाय करत आहेत.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
आधुनिक यांत्रिकीकरणाचा फटका, केरसुणीचा पारंपारिक व्यवसाय डबघाईस, सोलापुरात नेमकी काय परिस्थिती?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement