आषाढीसाठी धावणार विशेष एक्स्प्रेस; कुठपासून, कुठपर्यंत? संपूर्ण वेळापत्रक
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
अल्प प्रतिसादामुळे या गाडीच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली होती. आता प्रवाशांच्या मागणीमुळेच गाडी पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
इरफान पटेल, प्रतिनिधी
सोलापूर : आषाढी वारीसाठी राज्यभरातून भाविक पंढरपुरात येतात. त्यांच्या सोयीसाठी आणि अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनानं सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनल बंगळुरू - पंढरपूर - सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनल बंगळुरू ही विशेष एक्स्प्रेस गाडी पुन्हा सुरू होणार आहे.
अल्प प्रतिसादामुळे या गाडीच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली होती. आता प्रवाशांच्या मागणीमुळेच सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनल बंगळुरू - पंढरपूर - सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनल बंगळुरू विशेष एक्स्प्रेस पुन्हा धावणार आहेत.
advertisement
गाडी क्र. 06295/06296 सर एम. विश्वेश्वरय्या बंगळुरू - पंढरपूर - सर एम. विश्वेश्वरय्या बंगळुरू विशेष एक्स्प्रेस - 1 फेरी
गाडी क्र. 06295 सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनल बंगळुरू - पंढरपूर विशेष एक्स्प्रेस (1फेरी)
दिनांक 15.07.2024 रोजी सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनल बंगळुरू रेल्वे स्थानकाहून संध्याकाळी 10.00 वाजता निघणार आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 06.00 वाजता पंढरपूर रेल्वे स्थानकावर पोहचणार.
advertisement
गाडी क्र. 06296 पंढरपूर - सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनल बंगळुरू द्विसाप्ताहिक विशेष एक्स्प्रेस (1फेरी)
दिनांक 16.07.2024 पंढरपूर रेल्वे स्थानकाहून संध्याकाळी 10.00 वाजता निघणार आणि दुसऱ्या दिवशी सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनल बंगळुरू रेल्वे स्थानकावर दुपारी 12.30 वाजता पोहचणार.
गाडी क्र. 06297 सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनल बंगळुरू - पंढरपूर एकतर्फा विशेष एक्स्प्रेस
दिनांक 16.07.2024 रोजी सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनल बंगळुरू रेल्वे स्थानकाहून संध्याकाळी 10.00 वाजता निघणार आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी 06.20 वाजता पंढरपूर रेल्वे स्थानकावर पोहचणार.
advertisement
गाडी क्र. 06298 पंढरपूर - सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनल बंगळुरू एकतर्फा विशेष एक्स्प्रेस
दिनांक 17.07.2024 रोजी पंढरपूर रेल्वे स्थानकाहून संध्याकाळी 08.00 वाजता निघणार आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 03.10 वाजता सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनल बंगळुरू रेल्वे स्थानकावर पोहचणार.
थांबे - टुमकूर, गुब्बी, निटूर, संपिंगें रोड, टीपटूर, अरसिकेरे, बिरुर जं., चिकजाजूर, दावनगीर, हरिहर, राणीबेन्नूर, हावेरी, कराजगि, हुबळी, धारवाड, अलनावर, लोंढा जं., खानापूर, बेळगावी, गोकाक रोड, घटप्रभा, रायबाग, चिंचली,कुडाची, उगारखुर्द, मिरज, कवठेमहांकाळ, ढालगाव, सांगोला, पंढरपूर.
advertisement
संरचना - 1 प्रथम श्रेणी वातानुकूलित, 2 द्वितीय श्रेणी वातानुकूलित, 2 तृतीय श्रेणी वातानुकूलित, 06 शयनयान, 07 जनरल, 2 गार्ड ब्रेक वॅन, एकूण 20 कोच असतील.
आरक्षण - विशेष गाड्यांची बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि http://www.irctc.co.in या वेबसाइटवर सुरू आहे. वरील विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी http://www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा. प्रवाशांनी या विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा, असं आवाहन करण्यात आलंय.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
July 11, 2024 8:24 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
आषाढीसाठी धावणार विशेष एक्स्प्रेस; कुठपासून, कुठपर्यंत? संपूर्ण वेळापत्रक