भावाची जामिनावर सुटका, कारागृहाबाहेर फोडले फटाके, पोलिसांनी अशी घडवली अद्दल
- Published by:Mohan Najan
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
गुन्हेगार भावाची जामिनावर सुटका होताच सोलापूर जिल्हा कारागृहासमोर हिरोगिरी, फटाके फोडल्या प्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्यात तरुणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करत चांगलीच अद्दल घडवली आहे.
इरफान पटेल, प्रतिनिधी
सोलापूर : गुन्हेगार भावाची जामिनावर सुटका होताच सोलापूर जिल्हा कारागृहासमोर हिरोगिरी, फटाके फोडल्या प्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्यात तरुणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करत चांगलीच अद्दल घडवली आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अमिन यासीन शेख नेमणूक जेलरोड पोलीस ठाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रवीण गणेश चौगुले वय 19 रा. बोली मंगल कार्यालय अशोक चौक सोलापूर या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
प्रवीण यांचा भाऊ आरोपी असून त्याला एका गुन्ह्यात पोलिसांनी अटक करून सोलापूर जिल्हा कारागृहात जेरबंद केले होते. प्रवीणच्या भावाची जामिनावर सुटका होताच प्रवीणने बुधवार दिनांक 05 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास सोलापूर जिल्हा कारागृहाच्या मुख्य गेटच्या समोर असलेल्या रोडवर 15 शॉट (हवेत उडून फुटणारे फटाके) उडविले. म्हणुन प्रविण गणेश चौगुले वय 19 या तरुणावर भा.न्याय सहिंता कलम 223, महा. पोलीस अधिनियम कलम 135 प्रमाणे जेलरोड पोलीस ठाण्यात 07 मार्च 2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल नदाफ हे करत आहे.
advertisement
पुन्हा अशी चूक करणार नाही
बुधवार दिनांक 05 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास सोलापूर जिल्हा कारागृहाच्या बाहेर माझा भाऊ जामिनावर सुटताना फटाके उडविले. पुन्हा एकदा अशी चूक मी करणार नाही. अशा शब्दात प्रवीणने माफी मागितली आहे. त्या तरुणाने माफी मागितलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
advertisement
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
March 08, 2025 3:07 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
भावाची जामिनावर सुटका, कारागृहाबाहेर फोडले फटाके, पोलिसांनी अशी घडवली अद्दल