सोलापूर: CCTVच्या निगराणीत 19 जूनपासून पोलीस भरती; 50 जागांसाठी 2374 अर्ज

Last Updated:

सोलापूर शहर पोलीस दलातील 34 पोलीस शिपाई आणि 16 चालक पोलीस शिपाई अशा एकूण 50 रिक्त पदांसाठी 19 जूनपासून भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

+
मैदानावर

मैदानावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

इरफान पटेल, प्रतिनिधी
सोलापूर : महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील रिक्त पदं भरण्यासाठी घेतली जाणारी मैदानी चाचणी परीक्षा 19 जूनपासून संपूर्ण राज्यभर सुरू होणार आहे. महाराष्ट्र पोलीस दलात विविध 17 हजार रिक्त पदासांठी भरती होत आहे. 17 हजार पदांसाठी 17 लाख 76 हजार 256 अर्ज आले आहेत. यासाठी राज्यभर प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू आहे. सोलापूर शहर पोलीस दलातील 34 पोलीस शिपाई आणि 16 चालक पोलीस शिपाई अशा एकूण 50 रिक्त पदांसाठी 19 जूनपासून भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर इथं पोलीस शिपाई पदासाठी 1540 आणि चालक पोलीस शिपाई पदासाठी 834 असे एकूण 2374 आवेदन अर्ज प्राप्त झाले आहेत.
advertisement
काही उमेदवारांना एकाच दिवशी किंवा लागोपाठच्या दिवशी दोन पदांकरिता मैदानी चाचणीसाठी हजर राहण्याची स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे अशा उमेदवारांची गैरसोय होऊ नये म्हणून ज्या उमेदवारास एकाच वेळी दोन पदांकरिता मैदानी चाचणीस हजर राहण्याची सूचना दिली असेल तो उमेदवार पहिल्या ठिकाणी हजर राहिल्यानंतर त्याला दुसऱ्या ठिकाणी 4 दिवसांचं अंतर ठेवून वेगळी तारीख देण्यात येणार आहे. तसंच चाचणीदरम्यान पावसाचा अडथळा आल्यास पुढील सुयोग्य तारीख दिली जाईल. याव्यतिरिक्त उमेदवारांना काही इतर अडचणी आल्यास त्यांचं निरसन स्थानिक पातळीवर केलं जाईल. महत्त्वाचं म्हणजे मैदानावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. संपूर्ण भरती प्रक्रियेचं व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली.
advertisement
यंदा पोलीस भरतीत योग्य उमेदवाराची निवड केली जावी यासाठी रेडिओ फ्रीक्वेन्सी आयडेंटिफिकेशन तंत्र वापरण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यामुळे गैरप्रकारांना आळा बसणार असल्याचं म्हटलं जातंय. ही भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि गुणवत्तेवर आधारित असल्यानं उमेदवारांनी कोणत्याही अमिषाला बळी न पडता आपली कुशलता स्पर्धेत सिध्द करावी, असं आवाहन सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी केलं आहे.
advertisement
उमेदवारांसाठी देण्यात आलेल्या सूचना :
1. उमेदवाराने पोलीस भरती प्रकियेदरम्यान गैरशिस्त अथवा अशोभनिय वर्तन केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
2. उमेदवारास मोबाईल फोन मैदानात आणण्यास प्रतिबंध आहे.
3. उमेवाराने मैदानी चाचणीसाठी येतांना प्रवेशपत्र आणि आवेदन अर्जात नमूद कागदपत्र प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रती सोबत आणाव्यात. तसेच नुकतेच काढलेले किमान 3 पासपोर्ट साईझ फोटो सोबत आणावेत.
advertisement
4. उमेदवाराने प्रत्येक मैदानी चाचणी झाल्यावर आपले गुण बरोबर असल्याची खात्री करूनच नंतर सही करावी. चाचणी संपल्यानंतर उमेदवाराने गुणांबाबत केलेली कोणतीही तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही.
5. उमेदवाराचे मैदानी चाचणीत मिळवलेले गुण रोजचे-रोज पोलीस मुख्यालय, सोलापूर शहर येथे नोटीस बोर्डावर लावण्यात येतील, तसेच सोलापूर शहर पोलीस संकेतस्थळ, फेसबुक व ट्विटर अकाउंट येथे प्रसिध्द करण्यात येतील.
advertisement
6. उमेदवारांस लेखी परीक्षा व कौशल्य चाचणीची तारीख व वेळ यथावकाश कळविण्यात येईल.
7. सदर भरती प्रक्रिया ही अत्यंत पारदर्शकपणे पार पाडली जात असून उमेदवाराने कोणताही गैरप्रकार केल्यास त्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.
8. तसेच, उमेदवारांनी कोणत्याही अफवांना अगर अमिषांना बळी पडून स्वतःचे नुकसान व फसवणूक करून घेवू नये.
advertisement
9. उमेदवारांकडून सदर पोलीस भरतीच्या अनुषंगाने या अथवा इतर कार्यालयाकडील कोणताही अधिकारी / अंमलदार / लिपीक / त्रयस्थ व्यक्ती भरती करून देण्यासाठी पैशाची मागणी करत असल्याचे निदर्शनास आल्यास, अथवा सदर भरती प्रक्रियेसंदर्भात कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार अथवा भ्रष्टाचार आढळून आल्यास त्याबाबत तत्काळ अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
सोलापूर: CCTVच्या निगराणीत 19 जूनपासून पोलीस भरती; 50 जागांसाठी 2374 अर्ज
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement