धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त धावणार विशेष ट्रेन! 25 स्थानकांवर थांबेल
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
14 ऑक्टोबर 1956 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथील दीक्षाभूमीवर आपल्या 5 लाखांपेक्षा जास्त अनुयायांसोबत बौद्ध धर्म स्वीकारला होता. हा दिवस 'धम्मचक्र प्रवर्तन' दिन म्हणून साजरा केला जातो.
इरफान पटेल, प्रतिनिधी
सोलापूर: दरवर्षी 14 ऑक्टोबरला किंवा विजयादशमीच्या दिवशी 'धम्मचक्र प्रवर्तन' दिन साजरा केला जातो. हा बौद्ध धर्मीयांचा एक महत्त्वाचा सण आहे. 14 ऑक्टोबर 1956 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथील दीक्षाभूमीवर आपल्या 5 लाखांपेक्षा जास्त अनुयायांसोबत बौद्ध धर्म स्वीकारला होता. हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्तानं दरवर्षी लाखो अनुयायी नागपुरात दाखल होतात.
advertisement
अनुयायांची कुठलीही गैरसोय होऊ नये याची प्रशासनाकडून चोख काळजी घेतली जाते. यंदा मध्य रेल्वेकडून सोलापूर ते नागपूर मार्गावर विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. याबाबत सोलापूर रेल्वे विभागानं सविस्तर माहिती दिली आहे. दरम्यान, यंदा 12 ऑक्टोबरला विजयादशमी अर्थात दसरा आहे.
सोलापूर-नागपूर आरक्षित विशेष एक्सप्रेस!
गाडी क्र. 01029 विशेष दि. 11.10.2024 रोजी सोलापूरहून संध्याकाळी 6 वाजता सुटेल आणि नागपूरला दुसऱ्या दिवशी दुपारी 12.45 वाजता पोहोचेल. 2 तृतीय श्रेणी वातानुकूलित, 8 शयनयान, 6 जनरल, 2 गार्ड्स ब्रेक व्हॅन अशी या गाडीची रचना असेल.
advertisement
ही गाडी सोलापूर, कुर्डुवाडी, दौंड, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, नांदुरा, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, चांदूर, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सेवाग्राम, सिंदी, अजनी आणि नागपूर या स्थानकांवर थांबेल. http://www.enquiry.indianrail.gov.in या वेबसाइटवर आपण विशेष गाड्यांबाबत माहिती मिळवू शकता. दरम्यान, प्रवाशांनी या विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा, असं आवाहन सोलापूर रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलंय.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
October 09, 2024 1:59 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त धावणार विशेष ट्रेन! 25 स्थानकांवर थांबेल