पती आणि सासूने दिली साथ, ती बनली स्कूल व्हॅन ड्रायव्हर, सोलापूरच्या उज्वला यांची अनोखी कहाणी

Last Updated:

सोलापुरातील उज्वला यादव या गेल्या 6 वर्षांपासून स्कूल व्हॅन चालवत आहेत. या व्यवसायातून त्या महिन्याला 40 हजार रुपये कमवत आहेत.

+
पती

पती आणि सासूने दिली साथ; म्हणुन ती बनली स्कूल व्हॅन ड्रायव्हर

इरफान पटेल, प्रतिनिधी 
सोलापूर : महिला चूल आणि मूल यातून बाहेर पडून पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. बदलत्या काळात प्रत्येक क्षेत्रात महिला झेप घेत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. याचाच एक उत्तम उदाहरण म्हणजे सोलापुरातील उज्वला यादव या गेल्या 6 वर्षांपासून स्कूल व्हॅन चालवत आहेत. या व्यवसायातून त्या महिन्याला 40 हजार रुपये कमवत आहेत. या संदर्भात अधिक माहिती स्कूल व्हॅन चालक उज्वला यादव यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
advertisement
उज्वला निलेश यादव रा. ऋषिकेश नगर हैदराबाद रोड सोलापूर असे स्कूल व्हॅन चालक महिलेचे नाव आहे. तर उज्वला यादव यांचे शिक्षण एच.एस.सी डी.एड पर्यंत झाले आहे. शिक्षकीपेशा स्वीकारण्याऐवजी जरा हटके काहीतरी वेगळा काम करायचा त्यांनी निर्णय घेतला. यासाठी त्यांना पती आणि सासूने साथ दिली. त्यामुळे गेल्या 6 वर्षांपासून त्या स्कूल व्हॅन चालक म्हणून काम करत आहेत. आज त्यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढला असून 40 विद्यार्थ्यांना दररोज सुरक्षित शाळेत आणायचं आणि घरी सोडण्याचा काम करत आहेत. यासाठी त्या दररोज स्कूल व्हॅनने 104 किलोमीटरचा प्रवास करत आहेत.
advertisement
सुरुवातीला श्री सिद्धेश्वर वुमन्स पॉलिटेक्निकल, ऑर्चिड कॉलेज, सेंट जोसेफ स्कूल, श्री सिद्धेश्वर प्रशाला सोलापूर, या शाळेसाठी काम करत होते. आता इंडियन मॉडेल स्कूल, मॉडेल पब्लिक स्कूल, इंडियन मॉडेल इंटरनॅशनल स्कूल नागेश करजगी ऑर्किड स्कूलसाठी करते. या कामातून मुलांच्या उच्च शिक्षणासाठी चांगला हातभार लागतो, याचे विशेष समाधान मिळत असल्याचे उज्वला यादव यांनी सांगितले.
advertisement
आपल्या अंगी जिद्द आणि मेहनत करण्याची इच्छा असेल तर महिला देखील सुद्धा कोणताही क्षेत्र निवडू शकतात आणि आपण पाहिलेले स्वप्न पूर्ण करू शकतात. महिलांनी सुद्धा योग्य क्षेत्र निवडून आपण पाहिलेले स्वप्न पूर्ण करावे, असे आवाहन स्कूल व्हॅनचालक उज्वला यादव यांनी केले आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
पती आणि सासूने दिली साथ, ती बनली स्कूल व्हॅन ड्रायव्हर, सोलापूरच्या उज्वला यांची अनोखी कहाणी
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement