मुलाचं लग्न अर्ध्यावर सोडलं, कुटुंबाच्या डोळ्यात अश्रू, बुलढाण्यातील जवान तातडीने सीमेवर रवाना
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
India Pakistan Tension: बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील एका जवानाला आपल्या मुलाचं लग्न अर्ध्यावर सोडून देशसेवेसाठी सीमेवर परतावं लागलं आहे.
राहुल खंडारे, प्रतिनिधी बुलढाणा: मागील काही दिवसांपासून भारत पाक सीमेवर तणाव सुरू आहे. २२ एप्रिल रोजी जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्याचा भारताने ७ मेला बदला घेतला. भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी तळांवर हल्ला केला. ऑपरेशन सिंदूर राबवत १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानदरम्यान संघर्षाची ठिणगी पडली. दोन्ही बाजुंनी जोरदार गोळीबार आणि ड्रोन हल्ले करण्यात आले.
यानंतर चार दिवसांनी दोन्ही देशात शस्त्रसंधी झाली. अधिकृतपणे दोन्ही देशांनी शस्त्र खाली ठेवली. पण अजूनही सीमेवरील तणाव कमी झाला नाही. पाकिस्तानकडून कोणत्याही क्षणी हल्ला होऊ शकतो. पाकिस्तान शस्त्रसंधीचं उल्लंघन करू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जातेय. यामुळे भारतीय सैन्य दलाने सुट्टीवर गेलेल्या आपल्या सर्व सैनिकांना पुन्हा बोलावलं आहे. त्यामुळे कुणी स्वत:च्या लग्नासाठी, तर कुणी आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या लग्नासाठी सुट्टी घेतली होती. पण सर्वांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.
advertisement
अशात बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील एका जवानाला आपल्या मुलाचं लग्न अर्ध्यावर सोडून देशसेवेसाठी सीमेवर परतावं लागलं आहे. सैन्य दलाकडून त्यांना कर्तव्यावर परतण्याचा आदेश येताच ते तातडीने सीमेवर रवाना झाले आहेत. गजानन डाखोडे असं या जवानाचं नाव आहे. ते आपल्या मुलाच्या लग्नासाठी गावी आले होते. त्यांची सुट्टी २७ मे पर्यंत होती. मात्र भारत पाकिस्तानमधील तणावामुळे बॉर्डर वरील सर्व भारतीय सैनिकांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.
advertisement
त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात मुलाच्या लग्नासाठी आलेल्या भारतीय सैन्य दलातील जवान गजानन डाखोडे हे आपल्या मुलाचं लग्न अर्ध्यावर सोडून देश सेवेसाठी मार्गस्थ झाले आहेत. यावेळी कुटुंबीयांसह संपूर्ण गावकऱ्यांनी त्यांना देश सेवेच्या शुभेच्छा दिल्या. गजानन डाखोडे सीमेवर जात असताना कुटुंबासह गावकऱ्यांचे डोळे पाणवले होते.
view commentsLocation :
Buldana,Maharashtra
First Published :
May 15, 2025 7:47 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मुलाचं लग्न अर्ध्यावर सोडलं, कुटुंबाच्या डोळ्यात अश्रू, बुलढाण्यातील जवान तातडीने सीमेवर रवाना


