SSC Result: बाप तो बाप रहेंगा! वडील 1997 मध्ये नापास झाले अखेर 2025 मध्ये दहावी पास, पोऱ्या मात्र नापास!

Last Updated:

कुटुंब चालविण्यासाठी कलगटवार भंगार खरेदी- विक्रीचा व्यवसाय करत होते.

chandrapur News
chandrapur News
चंद्रपूर  : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या वर्षीही राज्यात मुलींनीच बाजी मारली आहे. निकालात कोकण पुन्हा 'नंबर वन' आहे. दहावीचा राज्याचा निकाल ९४.१० टक्के एवढा लागला आहे. चांगले गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचं कौतुक करण्यात येत आहे. याच दरम्यान चंद्रपुरातील एक कुटुंब वेगळ्या अडचणीत सापडले आहे . कारण वडिलांना परीक्षेत यश मिळाले मात्र मुलाला अपयश आले आहे.
राज्यभर दहावी परीक्षेचा निकाल लागला. या निकालात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी मोठा आनंद साजरा केला. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातल्या वढोली या छोट्या गावात कलगटवार कुटुंबात एकाच वेळी दहावीला असलेल्या वडील आणि मुलापैकी मुलगा नापास तर वडील पास असा निकाल लागल्याने आनंद व्यक्त करावा की दुःख अशी स्थिती निर्माण झाली.

1997 साली राहिलेले विषय आत्ता सोडवले

advertisement
अनिल कलगटवार अल्पशिक्षित होते. त्यांना दोन मुले आहेत. त्यापैकी मोठा अमित हा उत्तम शिक्षण घेऊन अग्नीवीर प्रशिक्षण प्राप्त करत सध्या मध्य प्रदेशात देशसेवा करत आहे. तर दुसरा लहान मुलगा प्रिन्स यंदा दहावीत होता. त्याला अभ्यास कर, यावर लेक्चर देतानाच मुलाने मात्र तुम्ही दहावी झाला नाहीत आणि आम्हाला अभ्यास करायला सांगतात असे उत्तर दिले. यावर जिद्द मनात बाळगत 1997 साली दहावीत दोन विषय राहिलेल्या अनिल यांनी यंदा दहावी उत्तीर्ण करण्याचा निर्धार केला.
advertisement

वडिल करायचे भंगारचा व्यवसाय

कुटुंब चालविण्यासाठी कलगटवार भंगार खरेदी- विक्रीचा व्यवसाय करतात. व्यवसाय- कुटुंब सांभाळून त्यांनी अभ्यासात लक्ष दिले आणि यंदा त्यांचा दहावी पासचा निकाल आला. मात्र त्याच वेळेस त्यांचा मुलगा प्रिन्स मात्र अपयशी ठरला. आता पुरवणी परीक्षेत आपण प्रिन्सच्या राहिलेल्या पेपरवर लक्ष केंद्रित करून दहावी उत्तीर्ण करण्यासाठी मदत करणार असल्याचे कलगटवार सांगतात.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
SSC Result: बाप तो बाप रहेंगा! वडील 1997 मध्ये नापास झाले अखेर 2025 मध्ये दहावी पास, पोऱ्या मात्र नापास!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement