Shahad Bridge: कल्याण-नगर मार्गावरील एसटी प्रवास महागला! नेमकं कारण काय?

Last Updated:

Shahad Bridge: कल्याणहून अहिल्यानगरला जाण्यासाठी दर 15 मिनिटांनी बस सुटतात.

Shahad Bridge: कल्याण-नगर मार्गावरील एसटी प्रवास महागला! नेमकं कारण काय?
Shahad Bridge: कल्याण-नगर मार्गावरील एसटी प्रवास महागला! नेमकं कारण काय?
कल्याण: कल्याण-मुरबाड-अहिल्यानगर मार्गावरील वाहतुकीत शहाड येथील पुल फार महत्त्वाचा आहे. या पुलाच्या दुरुस्तीचं काम हाती घेतल्याने तो काही दिवस बंद असणार आहे. त्यामुळे अनेकांची गैरसोय होणार आहे. एसटी सेवेला याचा सगळ्यात जास्त फटका बसणार आहे. कल्याणहून मुरबाड, अहिल्यानगरला जाणाऱ्या एसटीला लांबचा हेलपाटा मारावा लागणार आहे. प्रवासाचं अंतर जवळपास 12 किलोमीटरने वाढणार आहे. प्रवाशांना तिकिटासाठीही जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवेत एसटीला पुलाचा वापर करू देण्याची मागणी होत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शहाड येथील पुलाचे बेअरिंग बदलण्याचं काम होणार आहे. यासाठी 28 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबरपर्यंत हा पुल वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. त्यामुळे, मुरबाड आणि अहिल्यानगरहून कल्याणच्या दिशेने येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांना बारवी डॅम, बदलापूर, पालेगाव, नेवाळी, लोढा, शीळ, पत्री पूल असा प्रवास करावा लागणार आहे. या प्रवासासाठी एसटी प्रवाशांना जास्त तिकिट काढावं लागणार आहे.
advertisement
एसटीही अत्यावश्यक सेवा
कल्याणहून अहिल्यानगरला जाण्यासाठी दर 15 मिनिटांनी बस सुटतात. कल्याण-मुरबाड मार्गावरील प्रवासी देखील या गाड्यांनी प्रवास करतात. पुलावरून अत्यावश्यक सेवांना जाण्यास परवानगी आहे. एसटीही अत्यावश्यक सेवा असल्याने या पुलावरून एसटीला वाहतुकीसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी करणारं पत्र एसटीच्या ठाणे जिल्हा नियंत्रकांनी प्रशासनाला दिलं आहे. त्याबाबत अद्याप उत्तर आलेलं नाही.
advertisement
शेतीमालाच्या वाहतुकीला अडथळा
अहिल्यानगर आणि आळेफाटा येथून कल्याण कृषी बाजारात समितीत शेतीमालासह दुधाची आवक होते. मुरबाडच्या आसपासच्या ग्रामीण भागातूनही शेतमाल आणि दुधाची आवक होते. पूल वाहतुकीसाठी बंद असल्याने तसेच पर्यायी मार्ग हा लांबचा असल्याने शेतमालाच्या वाहतुकीस फटका बसण्याची शक्यता आहे. शिवाय मुरबाडहून मुंबईत नोकरीसाठी येणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. कल्याण आणि आसपासच्या भागातून देखील काही कामगार मुरबाड एमआयडीसीत जातात. त्यांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Shahad Bridge: कल्याण-नगर मार्गावरील एसटी प्रवास महागला! नेमकं कारण काय?
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement