मुनगंटीवार खडे-सरकार से बडे! भाजप शिंदेंच्या मंत्र्यांना तडाखे, तीन मंत्र्यांची पाचावर धारण
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आक्रमक पवित्र्याची महायुतीच्या मंत्र्यांनी धास्ती घेतली नाही तरचं नवलं.
नागपूर : हिवाळी अधिवेशनात विरोधकांपेक्षा भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनीच सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलंय. सुधीर मुनगंटीवार रोजच सरकारला घरचा आहेर देतायत. त्यामुळे मुनगंटीवारांना संताप आणि मंत्र्यांच्या डोक्याला ताप असं म्हणण्याची वेळ आलीये.
भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आक्रमक पवित्र्याची महायुतीच्या मंत्र्यांनी धास्ती घेतली नाही तरचं नवलं. कारण मुनगंटीवार प्रत्येक मुद्दा अत्यंत आक्रमकपणे सभागृहात मांडताना पाहायला मिळताहेत. त्यांच्या तडाख्यातून ना स्वपक्षीय सुटले ना मित्र पक्षाचा मंत्री सुटलाय.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे. त्यांना मानधन वेळेवर दिले जात नाही. समायोजन कधी करणार? नावा प्रमाणे समस्येचा जो अंधार झालाय, त्याला मंत्री प्रकाश अबिटकर न्याय देतील का? असा प्रश्न मुनगंटीवार यांनी विचारला. त्यावर या प्रश्नावर मार्ग काढला अशून कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेळेवर पगार होतील, असे उत्तर मुनगंटीवार यांनी दिले.
advertisement
इकडे भाजपचे मंत्री जयकुमार गोरेचेंही सुधीर मुनगंटीवारांनी कान टोचले. समुदाय संसाधन कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना मुनगंटीवारांनी मंत्री गोरेंना काँग्रेसच्या कारभाराची आठवण करुन देत घरचा आहेर दिला.
५२ हजार समुदाय संसाधन व्यक्ती, जीवन ज्योती कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. त्यावर समुदाय संसाधन कर्मचारीला ओळखपत्र देणार, असे उत्तर गोरे यांनी दिले. त्यावर सरकार भाजपचं अन् उत्तर काँग्रेसचं, चॅसी भाजपची आणि इंजिन काँग्रेसचं, असा निशाणा मुनगंटीवारांनी साधला.
advertisement
मुनगंटीवार एवढ्यावरचं थांबले नाहीत त्यांनी आपल्या मनातील खंतही बोलून दाखवली. त्यामुळे स्वपक्षीय मंत्र्याची सभागृहात चांगलीचं कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. सरकार आपलं आहे. जे दीन दलित रंजल्या गांजल्यांसाठी काम करतं. पण गोरे यांनी दिलेले उत्तर काँग्रेसचे आहे, असे ते म्हणाले.
मुनगंटीवार सभागृहातील ज्येष्ठ नेते पण काँग्रेसचं उत्तर, भाजपचं उत्तर हा प्रश्न नाही. त्यांचे मार्गदर्शन मी नेहमी घेत असतो, असे म्हणत मंत्री गोरे यांनी मुनगंटीवार यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.
advertisement
मराठवाड्यातील भाजपचे मंत्री अतुल सावेही मुनगंटीवारांच्या ताडाख्यातून सुटले नाहीत. 96 कोटी नसतील तर अधिकाऱ्यांनी कोरड्या विहिरीत जीव द्यावा, असे मुनगंटीवार म्हणाले. पुरवणी मागणीत 300 कोटी मंजूर, तात्काळ पैसे देण्यात येतील, असे सावे म्हणाले.
सुधीर मुनगंटीवर हे भाजपमधील वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी यापूर्वी राज्याचे वनमंत्री म्हणून काम पाहिलं आहे. पण यावेळी मात्र त्यांना मंत्रिमंडळात संधी काही मिळाली नाही. पण आता ते भलेही सत्ताधारी बाकावर असले तरी त्यांचा हा पवित्रा पाहूण ते विरोधी बाकावर तर नाही ना असा सत्ताधाऱ्यांनाच भास झाल्याशिवाय राहणार नाही.
view commentsLocation :
Nagpur,Maharashtra
First Published :
December 13, 2025 3:14 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मुनगंटीवार खडे-सरकार से बडे! भाजप शिंदेंच्या मंत्र्यांना तडाखे, तीन मंत्र्यांची पाचावर धारण










