'अजिबात खपवून घेणार नाही', झिरवाळांच्या कार्यालयात ACB चा छापा, सुनील तटकरे संतापले
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल, खासदार सुनील तटकरे, मंत्री हसन मुश्रीफ, पार्थ पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
प्रणाली कापसे, प्रतिनिधी, मुंबई : अन्न व औषध प्रशासन मंत्रालयातील लिपिक राजू ढेरिंगे याला लाच घेतल्याने पकडण्यात आल्याने मंत्री नरहरी झिरवाळ अडचणीत आलेले आहे. लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या (एसीबी) अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईसंदर्भात चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना झिरवाळ यांनी केल्या आहेत. या सर्व प्रकरणावर सुनील तटकरे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रफुल पटेल, खासदार सुनील तटकरे, मंत्री हसन मुश्रीफ, पार्थ पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी तटकरे यांची भेट घेतली. भाजप नेत्यांच्या गाठीभेटीनंतर तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मंत्री कार्यालयात कोणतीही वाईट बाब खपवून घेणार नाही
नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिकावर कारवाई करण्यात आली. लाच घेताना त्याला लाचलुचपत प्रतिबंध विभागाने पकडले. यावर सुनेत्रा पवार नाराज असल्याचे विचारल्यावर मंत्री कार्यालयात कोणतीही वाईट बाब खपवून घेतली जाणार नाही, अशा स्पष्ट सूचना दिल्याचे तटकरे म्हणाले.
advertisement
अजित पवार यांच्या अपघाताची सीबीआय चौकशी व्हावी
अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या पहिल्या दिवसापासून आम्ही चौकशीची मागणी करत आहोत. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून दादांच्या अपघाताच्या संदर्भाने सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली.
मला गोवण्याचा प्रश्नच येत नाही, माझे पक्षात कुणीही दुश्मनी नाही
मंत्रालयातील लाच प्रकरणावर मंत्री नरहरी झिरवाळ यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. या प्रकरणात मला कुणी गोवण्याचा प्रश्नच येत नसल्याचे ते म्हणाले. पक्षात माझा कुणी वैरी नाही. त्यामुळे मला कुणी गोवण्याचा प्रश्नच येत नाही, असे झिरवाळ म्हणाले.
advertisement
७५ संस्थांना अल्पसंख्याक दर्जाची खिरापत, तटकरे म्हणाले....
अल्पसंख्याक मंत्रालयाची धुरा सांभाळणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ज्या दिवशी अपघाती निधन झाले, त्याच दिवशी अल्पसंख्याक खात्याशी संबंधित अनेक फाईली मंत्रालयात मंजूर झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावर बोलताना तटकरे म्हणाले, संबंधित चुकीच काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट कारवाई झाली पाहिजे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 17, 2026 5:21 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'अजिबात खपवून घेणार नाही', झिरवाळांच्या कार्यालयात ACB चा छापा, सुनील तटकरे संतापले









