Nawab Malik : माजी मंत्री नवाब मलिक यांना जामीन, सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
Nawab Malik : नवाब मलिक यांना दीड वर्षानंतर दिलासा मिळाला असून त्यांना दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर केला आहे. सर्वोच्च न्यायालायने जामीन मंजूर केला असून वैद्यकीय कारणास्तव जामीनाला ईडीनेही विरोध केला नाही.
मुंबई, 11 ऑगस्ट : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना दीड वर्षाने जामीन मंजूर झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. ईडीने नवाब मलिक यांना फेब्रुवारी २०२२ मध्ये अटक केली होती. तेव्हापासून नवाब मलिक हे तुरुंगात आहेत. मनी लाँड्रिंग प्रकरणी नवाब मलिक यांना अटक केली होती. सर्वोच्च न्यायालायने जामीन मंजूर केला असून वैद्यकीय कारणास्तव जामीनाला ईडीनेही विरोध केला नाही.
सर्वोच्च न्यायालयाने नवाब मलिक यांना जामीन मंजूर करताना स्पष्ट केलं आहे की, हा जामीन दोन महिन्यांसाठी आहे. तसंच केवळ वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर करण्यात येत आहे. ईडीकडूनही वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्यास हरकत घेतली नाही. यामुळे वैद्यकीय कारणासाठी तरी नवाब मलिक यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
advertisement
नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारी 2022 रोजी मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने अटक केली होती. त्याआधी 8 तास त्यांची चौकशी करण्यात आली होती. मुंबईत आणि लगतच्या परिसरात ईडीनं छापेमारी केली होती. ईडीच्या रडारवर डॉन दाऊद इब्राहीमची मुंबईतली मालमत्ता आणि त्या संपत्तीशी निगडीत व्यवहार करणारे नेतेमंडळी होते. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर ईडीने ही कारवाई सुरू केली होती.
advertisement
काय आहे प्रकरण?
गोवावाला कंपाउंडमधील जमीन खरेदीत व्यवहारामध्ये मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली ईडीने नवाब मलिक यांची चौकशी केली होती. या चौकशीनंतरच ईडीने त्यांना अटक केली होती. दाऊद इब्राहिमच्या टोळीसोबत केलेल्या आर्थिक व्यवहारातून दहशतवाद्यांना अर्थसहाय्य केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. नवाब मलिक गोवावाला कंपाउंडमधील मुनीरा प्लबंर या महिलेची तीन एकर जागा कट रचून बेकायदेशीरपणे हडपल्याचा आरोप होता. यामध्ये नवाब मलिक यांच्यासोबत हसीना पारकर, सलीम पटेल आणि १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सरदार खान यांचीही नावे आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 11, 2023 3:45 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nawab Malik : माजी मंत्री नवाब मलिक यांना जामीन, सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा