Shivsena : धनुष्यबाण कोणाचा? सुप्रीम कोर्टात काही मिनिटांची सुनावणी, पण ठाकरेंना दिलासा, आज काय घडलं?

Last Updated:

Shiv Sena Election Symbol : आज ठाकरे गटाकडून दाखल केलेल्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचं वक्तव्य केले.

धनुष्यबाण कोणाचा? सुप्रीम कोर्टात काही मिनिटांची सुनावणी, पण ठाकरेंना दिलासा, आज काय घडलं?
धनुष्यबाण कोणाचा? सुप्रीम कोर्टात काही मिनिटांची सुनावणी, पण ठाकरेंना दिलासा, आज काय घडलं?
नवी दिल्ली: शिवसेना पक्षाचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. आज ठाकरे गटाकडून दाखल केलेल्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचं वक्तव्य केले. सुप्रीम कोर्टाने आज सुनावणी करण्यास नकार दिला. मात्र, ऑगस्ट महिन्यात या निवडणूक याचिकेवर सुनावणी घेणार असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले.
शिवसेनेत 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मोठी बंडखोरी झाली होती. त्यानंतर फेब्रुवारी 2023 मध्ये निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील गटाला शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह दिले होते.
निवडणूक आयोगाच्या या आदेशाला उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. जवळपास दोन वर्षानंतर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती सूर्यकांत व न्यायमूर्ती जॉयमल्ल्या बागची यांच्या खंडपीठापुढे सुनावणी पार पडली.
advertisement
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीआधी ही निवडणूक चिन्ह मिळावे यासाठी ठाकरे गट प्रयत्नशील आहे. त्यामुळे प्रलंबित याचिकेवर सुनावणी करण्यासाठी अर्ज ठाकरे गटाच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टाला दिला होता.  उद्धव ठाकरे यांनी याचिकेद्वारे शिवसेना हे नाव, धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह आणि वाघासह भगवा ध्वज पुन्हा वापरण्याची परवानगी देण्याची मागणी केली. कोर्टाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकरणात अजित पवार गटाला सशर्त चिन्ह वापरण्याची परवानगी दिली होती. तशी परवानगी आम्हाला दिली जावी अशीही मागणी केली आहे.
advertisement
ठाकरे गटाच्या याचिकेवर आज सुनावणी झाली. आज काही मिनिटांसाठी सुनावणी झाली. आजच्या सुनावणीच्या वेळी खंडपीठाने याचिकेबाबत महत्त्वाची टिप्पणी केली.
आजच्या सुनावणीच्या वेळी शिंदे गटाने याचिकेवर आक्षेप घेत ठाकरे गटाने दोन वर्षापासून कोणतीच हालचाल केली नाही आणि आता कोर्टाकडे आले आहेत. त्यावर सुप्रीम कोर्टाने म्हटले की, दोन वर्षांपासून हे प्रकरण प्रलंबित आहे. त्यामुळे आता ऑगस्ट महिन्यापासून याचा सोक्षमोक्ष लावला पाहिजे, असे वक्तव्य केले.
advertisement
advertisement

सुप्रीम कोर्टाचा ठाकरे गटाला दिलासा?

दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने सुनावणी घेण्याची तयारी सुप्रीम कोर्टाने दाखवली. त्यामुळे आता निवडणूक चिन्हाची कायदेशीर लढाई महत्त्वाच्या टप्प्यावर आली असल्याचे म्हटले जात आहे. निवडणूक चिन्हाच्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण होऊन निकाल सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत येईल असे मत ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. सिद्धार्थ शिंदे यांनी व्यक्त केले. राज्यात ऑक्टोबरच्या आसपास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्याआधी निकाल येण्याची शक्यता असल्याचे अॅड. शिंदे यांनी म्हटले.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Shivsena : धनुष्यबाण कोणाचा? सुप्रीम कोर्टात काही मिनिटांची सुनावणी, पण ठाकरेंना दिलासा, आज काय घडलं?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement