युगेंद्र पवारांचा साखरपुडा संपन्न, पवारांची नातसून कोण? सुप्रिया सुळेंनी फोटो केला शेअर
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
शरद पवारांचे नातू आणि अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांचा साखरपुडा संपन्न झाला. याबाबतचा फोटो सुप्रिया सुळेंनी शेअर केला.
शरद पवारांचे नातू आणि अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांचा साखरपुडा काही दिवसांपूर्वी संपन्न झाला होता. पण त्यांची होणारी पत्नी आणि पवार कुटुंबाची सून नेमकी कोण आहे? याबाबत कोणतीही माहिती समोर आली नव्हती. हा साखरपुडा सोहळा मोजक्या कुटुंबातील सदस्यांमध्ये संपन्न झाला होता. त्यामुळे युगेंद्र पवारांची पत्नी कोण? याबाबत सस्पेन्स निर्माण झाला होता. आता अखेर यावरचा पडदा हटला आहे.
बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअॅप स्टेटस टाकून युगेंद्र पवारांच्या साखरपुड्याची माहिती सार्वजनिक केली आहे. त्यांनी युगेंद्र पवार आणि त्यांच्या पत्नीचा फोटो स्टेटसला ठेवून जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत. युगेंद्र पवारांच्या पत्नीचं नाव तनिष्का आहे. सुप्रिया सुळेंनी स्टेटसमध्ये म्हटलं, युगेंद्रचा तनिष्कासोबत साखरपुडा पार पडला. आम्ही खूप आनंदी आहोत. रुतू , वेदिका आणि आता तनिष्काचं कुटुंबात स्वागत आहे.
advertisement
सुप्रिया सुळे यांनी स्टेटस ठेवल्यानंतर हा फोटो सोशल मीडियावर वेगानं व्हायरल झाला आहे. खरं तर, एप्रिल महिन्यात युगेंद्र पवारांचा वाढदिवस पार पडला होता. यावेळी शरद पवारांनी वाढदिवशी आशीर्वाद देताना अक्षता टाकायची संधी कधी देताय? आता जास्त लांबवू नका, असा गंमतीने सल्ला दिला होता. यानंतर युगेंद्र आणि तनिष्का यांना साखरपुडा केल्याची माहिती आहे.

advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर युगेंद्र पवार राकारणात सक्रिय झाले होते. लोकसभा निवडणुकीत त्यांनी गावोगावी जाऊन सुप्रिया सुळे यांचा प्रचार केला होता. याच काळात त्यांनी बारामती विधानसभा मतदारसंघात तरुण कार्यकर्त्यांनी फळी उभी केली होती. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसोबत संपर्क वाढवला होता. याचंच फळ म्हणून त्यांना शरद पवार यांनी बारामती विधानसभेतून अजित पवारांच्या विरोधात तिकीट दिलं होतं. त्यांनी आपल्या काकांना चांगली फाईट दिली होती.
Location :
Baramati,Pune,Maharashtra
First Published :
June 29, 2025 11:40 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
युगेंद्र पवारांचा साखरपुडा संपन्न, पवारांची नातसून कोण? सुप्रिया सुळेंनी फोटो केला शेअर