Tejasvee Ghosalkar: BMC आरक्षणाने उलथापालथ! नाराज झालेल्या ठाकरे गटाच्या तेजस्वी घोसाळकरांची पोस्ट चर्चेत, 'मी निवडणूक...'

Last Updated:

BMC Election Reservation : ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांच्या वॉर्डमध्ये ओबीसी आरक्षण लागल्याने त्यांची संधी हुकण्याची चिन्हे आहेत.

tejasvee ghosalkar
tejasvee ghosalkar
मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण जाहीर करण्यात आले. मंगळवारी झालेल्या या आरक्षण सोडतीनंतर अनेक माजी नगरसेवकांना धक्का बसला आहे. तर, दुसरीकडे जवळपास ५० हून अधिक माजी नगरसेवकांना दिलासा मिळाला असून त्यांचे प्रभाग कायम राहिले आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या अनेक माजी नगरसेवकांचे वॉर्ड आरक्षित झाल्याने त्यांना फटका बसला आहे. ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांच्या वॉर्डमध्ये ओबीसी आरक्षण लागल्याने त्यांची संधी हुकण्याची चिन्हे आहेत.
मुंबई महापालिकेच्या आरक्षण सोडतीत जवळपास ५९ माजी नगरसेवकांचे प्रभाग आरक्षण यंदाही कायम राहिले. त्यामुळे त्यांचा निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर, दुसरीकडे काहींनी आता इतर वॉर्डमध्ये चाचपणी सुरू केली आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांची पोस्ट चर्चेत आली आहे. काही महिन्यांपूर्वी तेजस्वी घोसाळकर या नाराज असल्याची चर्चा सुरू होती. भाजप अथवा शिंदे गटात प्रवेश करतील अशी चर्चा सुरू होती. मात्र, मातोश्रीवर झालेल्या चर्चेनंतर त्यांनी पक्षात राहण्याचा निर्णय घेतला. ठाकरे गटाकडून त्यांना स्थानिक पातळीवर महत्त्वाच्या जबाबदाऱ्याही सोपवण्यात आल्या. तेजस्वी घोसाळकरांनी महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केली होती. मात्र, आता त्यांचा वॉर्ड आरक्षित झाल्याने त्यांच्या निवडणूक लढवण्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
advertisement

तेजस्वी घोसाळकरांची पोस्ट चर्चेत...

ओबीसी आरक्षणात वॉर्ड आरक्षित झाल्यानंतर निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची संधी हुकल्याने तेजस्वी घोसाळकरांचा हिरमोड झाला आहे. त्यानंतर आता सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मनातल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.

पोस्टमध्ये नेमकं म्हटले तरी काय?

तेजस्वी घोसाळकरांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीतील वॉर्ड आरक्षणाची लॉटरी जाहीर झाली आहे. माझ्या वॉर्ड क्रमांक १ मधील जागा ओबीसी (इतर मागासवर्गीय) प्रवर्गासाठी राखीव करण्यात आली आहे.
advertisement
मी ओबीसी प्रवर्गातील नसल्यामुळे, मी ही निवडणूक लढवू शकणार नाही. हा निर्णय खरोखरच निराशाजनक आहे. मी निवडणूक लढवू शकत नाही म्हणून नाही, तर मी माझ्या वॉर्डातील आणि दहिसर विधानसभा मतदारसंघातील लोकांची प्रतिनिधी म्हणून सेवा करणे सुरू ठेवू शकणार नाही, याबद्दल वाईट वाटते.
advertisement
मात्र, हा निर्णय माझ्या सार्वजनिक सेवेच्या प्रवासात अडथळा आणणार नाही. अभिषेकच्या अकाली निधनापासून, मला घोसाळकर कुटुंबाकडूनच नव्हे तर माझ्या वॉर्ड, दहिसर आणि बोरिवलीतील प्रत्येक रहिवाशांकडून अपार प्रेम, विश्वास आणि पाठिंबा मिळाला आहे.
विश्वास आणि सेवेचे ते बंधन कायमचे कायम राहील. आज, उद्या आणि येणाऱ्या काळात, मी माझ्या वॉर्डातील आणि संपूर्ण दहिसर मतदारसंघातील लोकांसाठी नेहमीच उपलब्ध राहीन, त्यांच्या वैयक्तिक, सामाजिक किंवा नागरी समस्यांसाठी मदत करण्यास तयार राहीन असेही तेजस्वी घोसाळकरांनी म्हटले.
advertisement

इतर संबंधित बातमी:

view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Tejasvee Ghosalkar: BMC आरक्षणाने उलथापालथ! नाराज झालेल्या ठाकरे गटाच्या तेजस्वी घोसाळकरांची पोस्ट चर्चेत, 'मी निवडणूक...'
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement