Shiv Sena UBT MNS Election Manifesto: मुंबईकरांना मोफत औषधं आणि गल्लीबोळात 'बाईक ॲम्बुलन्स'! ठाकरेंच्या वचननाम्यात आरोग्यासाठी १० मोठ्या घोषणा

Last Updated:

Thackeray BMC Election manifesto For Health: युतीच्या जाहीरनाम्यात मुंबईकरांसाठीच्या विविध कळीच्या मुद्यांवर भाष्य करण्यात आले आहेत. मुंबईकरांना आरोग्याबाबत मोठी आश्वासने देण्यात आली आहेत. मुंबईतील गल्लीबोळात तातडीने उपचार देण्यासाठी बाईक अॅम्बुलन्सचे आश्वासन देण्यात आले आहे.

AI Image: मुंबईकरांना मोफत औषधं आणि गल्लीबोळात 'बाईक ॲम्बुलन्स'! ठाकरेंच्या वचननाम्यात आरोग्यासाठी १० मोठ्या घोषणा
AI Image: मुंबईकरांना मोफत औषधं आणि गल्लीबोळात 'बाईक ॲम्बुलन्स'! ठाकरेंच्या वचननाम्यात आरोग्यासाठी १० मोठ्या घोषणा
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचा संयुक्त जाहीरनामा आज प्रकाशित करण्यात आला. 'शिवशक्तीचा वचननामा, ठाकरेंचा शब्द' अशी टॅगलाईन या जाहीरनाम्यासाठी घेण्यात आली. युतीच्या जाहीरनाम्यात मुंबईकरांसाठीच्या विविध कळीच्या मुद्यांवर भाष्य करण्यात आले आहेत. मुंबईकरांना आरोग्याबाबत मोठी आश्वासने देण्यात आली आहेत. मुंबईतील गल्लीबोळात तातडीने उपचार देण्यासाठी बाईक अॅम्बुलन्सचे आश्वासन देण्यात आले आहे. त्याशिवाय कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराच्या उपचारासाठी सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचे आश्वासन या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे.

>> ठाकरेंच्या वचननाम्यात मुंबईकरांच्या आरोग्यासाठी काय?

> प्राथमिक आरोग्य सेवाच नव्हेत, तर सर्व प्रकारच्या, अगदी अत्याधुनिक वैद्यकीय सेवा पुरवता याव्यात यासाठी आधीपासूनच अस्तित्वात असलेली तीन वैद्यकीय महाविद्यालये आणि सर्वसाधारण रूग्णालये यांनंतर विलेपार्ले येथील कूपर रुग्णालय येथे बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे.
> दीड कोटी लोकसंख्येच्या मुंबईतील रूग्णांचा भार समर्थपणे पेलण्यासाठी आणि आरोग्य सेवांचा विस्तार करण्यासाठी मुंबईत आणखी पाच वैद्यकीय महाविद्यालयं (शताब्दी-गोवंडी, शताब्दी-कांदिवली, एम.टी. अग्रवाल-मुलुंड, भगवती- बोरिवली, राजावाडी-घाटकोपर येथे) सुरू करणार.
advertisement
> पालिका रूग्णालयांतील ओपीडी क्षमता दुप्पट करणार.
> महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे रोबोटिक ऑपरेशन थिएटर तसंच डिजिटल सब्स्ट्रॅक्शन एंजिओग्राफी / जलद रिकव्हरीसाठी लॅप्रोस्कोपी सर्जरी सुरु करणार.
> शताब्दी (कांदिवली), एमटी अग्रवाल (मुलुंड) आणि शताब्दी (गोवंडी) रुग्णालयांचे खासगीकरण होऊ देणार नाही.
> केंद्र व राज्य सरकार मान्यताप्राप्त जेनेरिक मेडिसिन दुकानांमध्ये पालिका रुग्णालयातील तसंच दवाखान्यातील डॉक्टरांनी प्रीस्क्रिप्शन दिलेल्या रुग्णांना जेनेरिक औषधे मोफत उपलब्ध करुन देणार.
advertisement
> ज्येष्ठ नागरिकांसाठी २४४७ हेल्थ केअर कंट्रोल रूम आणि आरोग्यसेवा आपल्या दारी (हेल्थ-टू-होम) या सेवा सुरू करणार.
> महापालिका स्वतःच्या मालकीची रूग्णवाहिका आणि शववाहिनी सेवा सुरू करणार.
> मुंबई महापालिकेचं स्वतःचं सुपर स्पेशालिटी कॅन्सर रुग्णालय असेल
> रॅपिड बाईक मेडिकल असिस्टेन्स (अॅम्ब्युलन्स) सेवा,
> मुंबईकरांना रॅपिडोच्या बाईकची नव्हे तर वाहतूककोंडीच्या तासांमध्येही अगदी गल्लीबोळात सहज आणि वेळेवर पोहोचेल अशा रॅपिड बाईक मेडिकल असिस्टंन (अॅम्ब्युलन्स) सेवेची आवश्यकता आहे.
advertisement
> गंभीर रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना तसंच हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक आलेल्या रुग्णांना प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी (पॅरामेडिकल स्टाफ) बाईकवर उपलब्ध असलेल्या जीवनरक्षक उपकरणांच्या (हार्ट शॉक मशीन - Defibrillator, ऑक्सिजन, नेब्यूलायजर आदींच्या) सहाय्याने 'गोल्डन अवर' मध्ये प्राथमिक उपचार करतील आणि रुग्णाला लवकरात लवकर नजीकच्या रुग्णालयात पोहोचवतील.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Shiv Sena UBT MNS Election Manifesto: मुंबईकरांना मोफत औषधं आणि गल्लीबोळात 'बाईक ॲम्बुलन्स'! ठाकरेंच्या वचननाम्यात आरोग्यासाठी १० मोठ्या घोषणा
Next Article
advertisement
Shiv Sena UBT MNS Election Manifesto: मुंबईकरांना मोफत औषधं आणि गल्लीबोळात 'बाईक ॲम्बुलन्स'! ठाकरेंच्या वचननाम्यात आरोग्यासाठी १० मोठ्या घोषणा
मुंबईकरांना मोफत औषधं आणि गल्लीबोळात 'बाईक ॲम्बुलन्स'! ठाकरेंच्या वचननाम्यात आरो
  • 'शिवशक्तीचा वचननामा, ठाकरेंचा शब्द' अशी टॅगलाईन या जाहीरनाम्यासाठी घेण्यात आली.

  • मुंबईकरांना आरोग्याबाबत मोठी आश्वासने देण्यात आली आहेत.

  • कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराच्या उपचारासाठी सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचे आ

View All
advertisement