Mahapalika Elections : मुलाविरोधात आईचं बंड, शेवटच्या दिवशीही अर्ज मागे नाही, महाराष्ट्रातली ही निवडणूक सगळ्यात चर्चेत!
- Reported by:AJIT MANDHARE
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी 15 जानेवारीला मतदान पार पडणार आहे, या निवडणुकांसाठी अर्ज मागे घ्यायचा आजचा शेवटचा दिवस आहे.
ठाणे : महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी 15 जानेवारीला मतदान पार पडणार आहे, या निवडणुकांसाठी अर्ज मागे घ्यायचा आजचा शेवटचा दिवस आहे. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या महापालाकिांमध्ये अनेक उमेदवार अर्ज मागे घेत असतानाच ठाण्यामध्ये मात्र आई आणि मुलगा आमने-सामने उभे ठाकले आहेत. ठाण्याच्या प्रभाग क्रमांक 23 मधून आई प्रमिला केणी आणि शिवसेनेचे मंदार केणी आमने-सामने आहेत.
ठाण्यामध्ये आई आणि मुलगा एकमेकांविरोधात निवडणूक लढणार आहेत. प्रमिला केणी यांनी शिवसेनेच्या विरोधात बंडखोरी केली आहे. शिवसेनेने तिकीट न दिल्यामुळे प्रमिला केणी निवडणुकीच्या रिंगणात उभ्या आहेत. धक्कादायक म्हणजे प्रमिला केणी यांच्या करता शरद पवार गटाच्या दिपा गावंड यांनी माघार घेतली आहे. शरद पवार गटाने अपक्ष प्रमिला केणी यांना पाठिंबा दिला आहे.
advertisement
प्रमिला केणी यांचा मुलगा मंदार केणी शिवसेनेतून तर आई अपक्ष शरद पवार गट पुरस्कृत निवडणूक लढवत आहेत. प्रमिला केणी प्रभाग क्रमांक 23 ब मधून आणि मुलगा मंदार केणी प्रभाग क्रमांक 23 ड मधून निवडणूक लढवत आहेत.
ठाण्यामध्ये कुणाची लढत?
ठाणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेना 131 पैकी 87 जागांवर तर भाजप 40 जागांवर निवडणूक लढवत आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना 53, मनसे 34 आणि शरद पवारांची राष्ट्रवादी 36 जागांवर लढत आहे. काँग्रेसने ठाण्यात 100 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत, याशिवाय अजित पवारांची राष्ट्रवादी 75 जागांवर लढत आहे.
view commentsLocation :
Thane,Maharashtra
First Published :
Jan 02, 2026 4:22 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mahapalika Elections : मुलाविरोधात आईचं बंड, शेवटच्या दिवशीही अर्ज मागे नाही, महाराष्ट्रातली ही निवडणूक सगळ्यात चर्चेत!











