Teeth Problem : दिवसातून 2-3 वेळा घासूनही दात खराब कसे होतात? दोष ब्रशचा नाही, डॉक्टरांनी सांगितलं वेगळंच कारण

Last Updated:
Teeth Problem Even after Brushing : दिवसातून दोनदा नाही तीनदा दात घासले, दात स्वच्छ ठेवण्यासाठी पूर्ण काळजी घेतली तरी ते खराब होतात, तुमचीही हीच समस्या आहे का? तर डॉक्टरांनी यामागील नेमकं कारण सांगितलं आहे.
1/7
सामान्यपणे दिवसातून 2 वेळा दात घासावेत असं सांगितलं जातं. एकदा सकाळी आणि एकदा रात्री. तरी काही लोक दिवसातून फक्त दोनदा नाही तर तीनदाही ब्रश करतात. जेणेकरून दात स्वच्छ राहावेत. पण तरी त्यांचे दात खराब होतात, असं कसं, असा प्रश्न कित्येकांना पडला असेल.

advertisement
2/7
दिवसातून 3 वेळा ब्रश करूनही दातांवर टार्टर म्हणजे पांढरा किवा पिवळा थर साचतोय का? मग दोष ब्रशचा नाही तर कारण वेगळं आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

3/7
यापैकी पहिलं म्हणजे दातांची रचना. दात वाकडे-तिकडे असतील तर ब्रश काही ठिकाणी पोहोचतच नाही. तिथे अन्नकण अडकतात आणि हळूहळू टार्टर तयार होतं.

4/7
तसंच ब्रश करण्याची चुकीची पद्धत. फक्त पुढचे दात घासले जातात, पण मागचे दात, हिरड्यांची कडा नीट स्वच्छ होत नाही. दातांमधील जागा स्वच्छ न करणे ब्रश पोहोचू शकत नाही अशा जागेत अन्नकण साचून टार्टर होतं.

5/7
काही लोकांच्या थुंकीत कॅल्शियम जास्त असतं, म्हणून प्लाक पटकन घट्ट होतो आणि टार्टर बनतं. का बाजूनेच खाण्याची सवयही यासाठी कारणीभूत आहे.  एक बाजू जास्त वापरली जाते, दुसरी बाजू दुर्लक्षित राहते आणि त्या बाजूला टार्टर लवकर साचतं.

6/7
जास्त चहा-कॉफी, तंबाखू, गुटखा सेवन या सवयींमुळे दातांवर चिकट थर लवकर बसतो आणि टार्टर वाढायला लागतात.

7/7
डेंटिस्ट डॉक्टर महेश गव्हाणे यांनी दिलेली ही माहिती. त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट करत ही माहिती दिली आहे. (सर्व फोटो : प्रतीकात्मक)

Pune: भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा, सीसीटीव्ही फुटेज समोर
भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा
  • बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिरात मारहाणीचा प्रका

  • शिंदे गटाचे पुणे उत्तर जिल्हाप्रमुख देवदास दरेकर यांनी पुजाऱ्याला मारहाण केली.

  • कोणतीही पोलीस तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

View All
advertisement