TMC Recruitment: ठाणे महानगरपालिकेत तरुणांसाठी नोकरीची मोठी संधी; 'या' पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, कसा कराल अर्ज?

Last Updated:

Career Opportunities : ठाणे महानगरपालिकेत तरुणांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. विविध गट-क व गट-ड पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

News18
News18
ठाणे महानगरपालिकेत आता नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. गट-क आणि गट-ड मधील विविध रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाद्वारे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांमध्ये प्रशासकीय, लेखा आणि तांत्रिक , अग्निशमन, शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय, निमवैद्यकीय अशा विविध सेवांचा समावेश आहे. भरती प्रक्रियेत योग्य स्पर्धा व्हावी यासाठी पुरेसे अर्जदार असणे आवश्यक आहे.
भरती प्रक्रियेसाठी अर्जाची तारीख
एकूण 1773 पदांसाठी अर्ज करण्याची संधी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दि. 12 ऑगस्ट 2025 ते दि.2 सप्टेंबर 2025 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 2 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंत आहे. या भरतीसाठी अर्ज हे फक्त ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर www.thanecity.gov.in उपलब्ध आहे.
advertisement
अनुसूचित जमाती प्रवर्गातील लिपीक आणि टंकलेखक (7 पदे) आणि अग्निशामक (2 पदे), चालक पंत्रचालक (9 पदे) आणि वॉर्डबॉय (2 पदे) अशा एकूण 12 पदांचा समावेश आहे. माजी सैनिक आणि दिव्यांग माजी सैनिक उमेदवारांसाठी अर्ज शुल्क पूर्णतः माफ असणार असून इतर सर्व उमेदवारांनी अर्ज आणि परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीनेच भरावे लागेल. परीक्षा शुल्क परत न होणारे (Non-Refundable) असून, बँकेचे अतिरिक्त शुल्क उमेदवाराने स्वतः भरावे लागेल.
advertisement
एकापेक्षा अधिक पदांसाठी अर्ज करायचा असल्यास प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज आणि स्वतंत्र शुल्क भरणे बंधनकारक आहे. भरती प्रक्रिया कोणत्याही कारणास्तव स्थगित झाल्यास अर्ज शुल्क परत दिले जाणार नाही. यात अर्ज करण्याची पद्धत, पदांचा तपशील, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, निवड पद्धत, अटी-शर्ती, शैक्षणिक पात्रता, आरक्षण नियम, परीक्षा शुल्क आणि अर्ज भरण्याच्या मार्गदर्शक सूचना ठाणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. पात्र उमेदवारांनी निश्चित वेळेत अर्ज सादर करून ही सुवर्णसंधी मिळवावी.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
TMC Recruitment: ठाणे महानगरपालिकेत तरुणांसाठी नोकरीची मोठी संधी; 'या' पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, कसा कराल अर्ज?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement