50 रुपयांपासून करा सणासुदीला खरेदी; खिशाला परवडेल अन् घरही दिसेल सुंदर
- Published by:News18 Lokmat
Last Updated:
सणासुदीच्या दिवशी घर सुंदर दिसण्याठी अनेक पर्याय अगदी कमी किंमतीमध्ये उपलब्ध आहेत.
डोंबिवली, 16 ऑगस्ट : अधिकमास संपला असून श्रावण महिना सुरू झाला आहे. या महिन्यात व्रत वैकल्ये आणि सणवार सुरू होतात. थेट दिवाळीपर्यंत सणासुदीचे दिवस असतात. हे सण साजरे करण्यासाठी खरेदी ही ओघानं आलीच. या खरेदी घरात लागणाऱ्या दिसयाला छोट्या पण उपयुक्त वस्तू लागतात. डोंबिवलीत या वस्तू सध्या अगदी स्वस्त दरात मिळत आहेत.
डोंबिवली स्टेशनजवळ सुरु असलेल्या रेनबो सेलमध्ये या वस्तू स्वस्त दरात मिळत आहेत. अगदी 50 रुपयांपासून घरगुती वापरासाठी वस्तू इथं मिळतात. त्यामुळे त्याच्या खरेदीसाठी महिलांची मोठी गर्दी आहे.
त्याचबरोबर या सेलमध्ये कपडे, चादरी, पडदे, ज्वेलरी, किचनमधील लहान-मोठ्या वस्तू, लोणची, मसाले, पापड , बिस्किटे, वेगवेगळ्या प्रकारचे मुखवास या सारख्या अनेक वस्तू आहेत. महिलांच्या कुडत्यांची किंमत येथे 200 रुपयांपासून सुरू होते. तर पुरुषांचे कॉटनचे शर्ट 350 रुपयाला मिळत आहेत.
advertisement
घरगुती वस्तू आणि कपड्यांप्रमाणेच ज्वेलरीही या सेलमध्ये कमी किंमतीत मिळते. मंगळसूत्र, कानातले, हार, विविध डीझाईनचे नेकलेस येथे उपलब्ध आहेत. त्यामुळे मंगळागौरी किंवा अन्य सणांना साडीवर घालण्यासाठी चांगले पर्याय तुम्हाला इथं मिळू शकतात.
मोदक बनवण्यासाठी यंत्र
advertisement
मोदक बनवण्यासाठी एक नवीन यंत्र आला आसुन हे फक्त 100 रुपयाला आहे अशी माहिती विक्रेत्यांनी दिली. विशेष म्हणजे या यंत्रामुळे महिलांना मोदकाला आकार देण्यासाठी आता कष्ट घ्यावे लागणार नसल्याचे विक्रेते सांगतात. याचबरोबर ताक किंवा कॉफी बनवण्यासाठी एक सेलवर चालणारे यंत्र देखील येथे उपलब्ध आहे. हा सेल डोंबिवली स्थानकाजवळ असून दिवाळीपर्यंत सुरू राहणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
advertisement
Location :
Kalyan-Dombivli,Thane,Maharashtra
First Published :
August 16, 2023 3:34 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
50 रुपयांपासून करा सणासुदीला खरेदी; खिशाला परवडेल अन् घरही दिसेल सुंदर

