भाऊरायाला द्या पालक, काकडी, तुळशीच्या बिया; राखीचा असा वापर कुणीच केला नसेल!

Last Updated:

सध्या रक्षाबंधनला इको फ्रेंडली राखींचा ट्रेंड आहे. मात्र, भाऊरायासाठी आपण या खास राखी बनवून घेऊ शकता.

+
भाऊरायाला

भाऊरायाला द्या पालक, काकडी, तुळशीच्या बिया; राखीचा असा वापर कुणीच केला नसेल!

छत्रपती संभाजीनगर, 12 ऑगस्ट : रक्षाबंधन हा सण भाऊ-बहिण्याच्या नात्याचा अनोखा बंध मानला जातो. बहीण या दिवशी भाऊरायाच्या हातात राखी बांधते आणि भाऊ आपल्या लाडक्या बहिणीसाठी खास भेट देत असतो. अलिकडे पर्यावरणपुरक राखीचा ट्रेंड आहे. आपणही आपल्या भावासाठी हटके अशी राखी निवडण्याचा विचार करत असाल तर छत्रपती संभाजीनगरमधील इनोरी क्राफ्ट यांनी असा पर्याय उपलब्ध करून दिलाय. पालक, काकडी, तुळशीच्या बियांच्या सुंदर राखी बाजारात उपलब्ध असून त्या आपण मागवूही शकता.
पर्यावरणपुरक राखीचे विविध प्रकार
यंदा रक्षाबंधनसाठी इनोरी क्राफ्ट यांनी पर्यावरणपुरक राखी तयार केल्या आहेत. या राखी आकर्षक आणि कल्पक आहेत. यात बीज राखीची अनोखी संकल्पना वापरण्यात आली आहे. लोकरीच्या धाग्यापासून हाताने विणलेली राखी आकर्षणाचा विषय ठरतेय. यात पालक, काकडी, तुळस, लिली आदींच्या बियांचा वापर करण्यात आला आहे. नैसर्गिक रंग आणि बिया, पाने, फुले यांपासून बनवलेल्या राख्या अनेकांच्या पसंतीस उतरत आहेत. रक्षाबंधन झालं की ही राखी कुंडीमध्ये लावून त्यातून छान झाड येऊ शकतं, अशी ही आयडिया आहे.
advertisement
चक्क दगडांची राखी
इनोरी क्राफ्ट यांनी पर्यावरणपुरक राखीचा अनोखा प्रकार तयार केला आहे. पेबल आर्ट म्हणजे दगडांवरती छान कलाकृती तयार करून त्याची राखी बनवली आहे. दगडांच्या रंगबेरंगी खड्यांवर विविध चित्रं, फुलं काढून या राख्या तयार केल्या आहेत. राखीच्या मागून छोटंसं मॅग्नेट लावलेलं आहे. ही राखी अतिशय आकर्षक दिसते. तसेच रक्षाबंधन झाल्यावर फ्रिज मॅग्नेट म्हणूनही तिचा वापर करता येतो. आपल्या भावाजवळ आपली आठवण कायम राहील असाच हा प्रकार आहे. त्यामुळे अनेक बहिणींची या राखींना पसंती आहे.
advertisement
आवडीनुसार राखी तयार करून घेण्याची सोय
विशेष म्हणजे आपल्या आवडीनुसार पेबल आर्ट्सच्या जागा आपण तयार करून घेऊ शकतो. आपल्या भावाच्या किंवा आपल्या आवडीनुसार त्या ठिकाणीच चित्र किंवा कलाकृती तयार करता येते. या राख्या अगदी कमी किमतीत तयार करून मिळतात. यातील एक राखी घेतली तर आपल्याला 80 रुपयांत मिळते. तर पूर्ण पाकीट घेतलं तर ते 150 रुपयांत उपलब्ध होतं. यात बीज राखी, पेबल आर्ट राखी, दोन चॉकलेट, अक्षदा आणि कुंकू आहे.
advertisement
ऑर्डर करण्यासाठी पत्ता
ही राखी तुम्ही घरबसल्या देखील ऑर्डर करू शकता. स्टुडिओ इनोरी, प्लॉट क्र. 17, माहूर, क्यूट डकलिंग इंग्लिश स्कूल, श्रेयश बालक मंदिर शाळेजवळ, उस्मानपुरा, छत्रपती संभाजी नगर, या पत्त्यावर राखी उपलब्ध आहेत. तसेच 9403949416 या मोबाईल नंबर वरून देखील तुम्ही ही राखी घरबसल्या ऑर्डर करू शकता. किंवा www.innori.in या वेबसाईटवरून देखील तुम्ही राखी घेऊ शकता. आमच्या सर्व राखी या पर्यावरण पूरक आहेत. यातून पर्यावरणास कोणतेही नुकसान होत नाही. तसेच सर्व राखी या प्लास्टिक फ्री आहेत. रक्षाबंधन नंतर देखील तुम्ही या राख्या उपयोगात आणू शकता. तसेच तुम्हाला हव्या तशा राखी बनवूनही घेऊ शकता, असे इनोरी क्राफ्टच्या प्राची पवर्धन जोशी यांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
भाऊरायाला द्या पालक, काकडी, तुळशीच्या बिया; राखीचा असा वापर कुणीच केला नसेल!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement