15 वर्षे जुनी वाहने आता थेट भंगारात, सरकारचा मोठा निर्णय, अंमलबाजवणीचे निर्देश
- Reported by:Sakshi Sushil Patil
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
old vehicle scrap policy: रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 15 वर्षे जुन्या वाहनांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रदुषण टाळण्यासाठी ही वाहने आता भंगारात घालावी लागणार आहेत.
नवी मुंबई : वाढते प्रदूषण रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. 2021 मध्येच घेतलेल्या या निर्णयाची आता थेट अंमलजबावणी करण्यात येणार आहे. त्यानुसार 15 वर्षाहून जास्त जुन्या वाहनांच्या वापरास बंदी घालण्यात आली असून ही वाहने थेट भंगारात काढण्यात येणार आहेत. मोटार वाहन कायद्यातील सुधारणांच्या काटेकोर अंमलबजावणीचे निर्देश आता संबंधित विभागांना देण्यात आले आहेत. त्यामुळे अशा वाहनधारकांना आता कारवाईला सामोरं जावं लागणार आहे.
शासकीय वाहने सुसाट
नवी मुंबईत महापालिका, सिडको आणि एमआयडीसी हे तीन प्रमुख शासकीय प्राधिकरणांची कार्यालये आहेत. कार्यालयांतील अधिकाऱ्यांसाठी बाह्य संस्थेच्या माध्यमातून वाहने पुरविली जातात. खासगी वाहतूक संस्थेने पुरविली बहुतांशी वाहने 15 वर्षे जुनी असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांतील अर्थपूर्ण व्यवहारामुळे ही वाहने सुसाट धावताना दिसत असल्याचं सांगण्यात येतंय.
advertisement
भंगार वाहने रस्त्यावर
नवी मुंबई शहराच्या बहुतांशी रस्त्यांवर जुन्या आणि मोडकळीस आलेल्या वाहनांची बेकायदा पार्किंग दिसून येतेय. वर्षानुवर्षे एकाच जागेवर पडून असलेल्या या भंगार वाहनांचा वाहतुकीबरोबरच दैनंदिन साफसफाईला देखील अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे वाहतूक विभाग आणि महापालिकेच्या माध्यमातून अशा वाहनांच्या मालकांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी संबंधित विभागांकडून विशेष मोहीम राबविली जात असून, कारवाई करण्यात येत आहे.
advertisement
दरम्यान, केंद्र सरकारच्या निर्णयामुळे नवी मुंबईत रस्त्यावर दिसणाऱ्या 15 वर्षे जुन्या वाहनांवर आता थेट कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे अशा वाहनधारकांना वाहतूक नियमांचे पालन करावे लागणार असून वाहने स्क्रॅप म्हणजेच भंगारात काढावी लागणार आहेत.
Location :
Navi Mumbai,Thane,Maharashtra
First Published :
Mar 11, 2025 10:15 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
15 वर्षे जुनी वाहने आता थेट भंगारात, सरकारचा मोठा निर्णय, अंमलबाजवणीचे निर्देश








