BH Series: तुम्हीही घेऊ शकता ‘बीएच’ सिरीजचा नंबर, एकदा घ्या अन् देशात कुठेही फिरा, टेन्शनच नाही!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
BH Series: रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने वाहनांसाठी बीएच सिरीज सुरू केलीये. नोकरी, व्यवसाय अथवा पर्यटनासाठी सतत परराज्यात प्रवास करणाऱ्या नागरिकांना या सुविधेचा फायदा होणार आहे.
मुंबई: एखाद्या राज्यात नोंदणी झालेली गाडी घेऊन दुसऱ्या राज्यात गेल्यास वाहनधारकांना बऱ्याचदा समस्यांचा सामना करावा लागतो. 4 वर्षांपूर्वी परिवहन विभागाने नोंदणी क्रमांकात बीएच (भारत) सिरीज सुरू केलीये. नोकरी, व्यवसाय अथवा पर्यटनासाठी सतत परराज्यात प्रवास करणाऱ्या नागरिकांना या सुविधेचा फायदा होणार आहे. बीएच सिरीजने वाहनांची नोंदणी केल्यास कोणत्याही राज्यात गेले तरी नंबर बदलण्याची गरज लागणार नाही. या सिरीजसाठी मुंबईतील आरटीओ कार्यालयात 11 हजार 208 गाड्यांची नोंदणी झालीये.
देशातील रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 26 ऑगस्ट 2021 रोजी भारत (बीएच) मालिका नोंदणी सुरू केली. त्याची अंमलबजावणी 15 सप्टेंबर 2021 रोजीपासून करण्यात आली. बीएच मालिकेअंतर्गत नोंदणी झालेल्या वाहन मालकाला दर 2 वर्षांनी तो ज्या राज्यात आहे तेथील अधिसूचित दरापेक्षा 25 टक्के जास्त दराने वाहन कर भरावा लागतो. त्यामुळे वाहन हस्तांतरण संबंधित परिवहन विभागावरील भार देखील हलका होतो.
advertisement
परराज्यात बदली होणाऱ्यांना दिलासा
‘बीएच’ सिरीजचा परराज्यात बदली होणाऱ्या सरकारी आणि खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होतोय. प्रत्येकवेळी राज्य बदलल्यानंतर त्यांना वाहनाची नोंदणी करण्याची आवश्यकता राहत नाही. त्यामुळे त्यांचा खर्च आणि वेळ देखील वाचत आहे.
कोण अर्ज करू शकतो?
बीएच सिरीजसाठी राज्य आणि केंद्र सरकारचे कर्मचारी अर्ज करू शकतात. संरक्षण क्षेत्रातील कर्मचारी, बँक कर्मचारी, प्रशासकीय कर्मचारी देखील अर्ज करू शकतात. तसेच चार किंवा अधिक राज्यात कार्यालये असणाऱ्या खासगी कंपन्यांचे कर्मचारी देखील बीएच सिरीजसाठी अर्ज करू शकतात.
advertisement
कसा करणार अर्ज?
बीएच सिरीजसाठी ‘मॉर्थ’ वाहन पोर्टलवर लॉगिन करा. फॉर्म 20 भरावा. खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी फॉर्म 60, वर्क सर्टिफिकेट आणि कर्मचारी ओळखपत्राची प्रत जमा करावी. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी. ऑनलाईन शुल्क किंवा मोटार वाहन कर भरावा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 11, 2025 9:45 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
BH Series: तुम्हीही घेऊ शकता ‘बीएच’ सिरीजचा नंबर, एकदा घ्या अन् देशात कुठेही फिरा, टेन्शनच नाही!