14 वर्षांपासून अंथरुणाला खिळून गोविंदा, नेत्यांनी फिरवली पाठ; मुलासाठी आईचं मुख्यमंत्र्यांना साकडं

Last Updated:

भिवंडीतला नागेश भोईर हा गोविंदा 14 वर्षांपासून अंथरुणाला खिळून आहे.

+
News18

News18

मुंबई, 26 ऑगस्ट : श्रावण महिना सुरु होताच सर्वांना दहीहंडीचे वेध लागतात. गोविंदा पथकांचा सराव आता अंतिम टप्प्यात आलाय. गोपाळकाल्याच्या दिवशी दहीहंडी फोडण्यासाठी या पथकांमध्ये चुरस लागते. श्वास रोखून धरणारा थरांचा थरथराट अनुभवयाला मिळतो. गोविंदा रे गोपाळा... या जयघोषात गोविंदा पथकं थरांचे विक्रम करतात. पण, त्या दिवशी घडलेली एखादी चूक गोविंदांचं आयुष्य बदलू शकते. भिवंडीचा नागेश भोईर गेल्या 14 वर्षांपासून हा त्रास सहन करतोय.
भिवंडीच्या जय महाराष्ट्र गोविंदा पथकातील नागेश 14 वर्षांपूर्वी सहाव्या थरावरुन खाली पडला. त्यानंतर तो अंथरुणाला खिळून आहे. त्याची नोकरी गेली. राजकीय पुढाऱ्यांनी त्याच्याकडं पाठ फिरवली. त्यामुळे त्याच्या उपचारासाठी आणि उदरनिर्वाहासाठी भोईर कुटुंबावर वन-वन फिरण्याची वेळ ओढावलीय.
advertisement
'त्या' अपघातानं बदललं आयुष्य
भिवंडीच्या छोट्याश्या कुटुंबात राहणाऱ्या नागेशची आई गृहिणी असून वडील खासगी कंपनीत नोकरी करतात. चार बहिणींच्या पाठीवर लाडका भाऊ म्हणजे नागेश. सर्वात मोठ्या बहिणीला ब्रेन ट्यूमरचा आजार आहे. नागेश ला लहानपणापासूनच दहीहंडीतल्या थरांचे प्रचंड आकर्षण होते. सुरुवातीला तो परिसरातल्या गोविंदा पथकांचा सदस्य होता.
नागेश एकोणिसाव्या वर्षी भिवंडीतील प्रसिद्ध जय महाराष्ट्र गोविंदा पथकात सहभागी झाला. त्यानंतर काही वर्ष त्यानं या पथकासह ठाण्याच्या मानाच्या दहीहंडी फोडल्या.  उंचावर जाण्याची त्याची आवडच त्याचा घात करणारी ठरली. 2009 मध्ये भिवंडीतल्या ब्राह्मण आळीतील टिळक चौक मित्र मंडळाने बांधलेली हंडी फोडण्यासाठी नागेश आपल्या पथकासोबत आला सहाव्या थरावर चढवून त्याने हंडी फोडली पण हंडी बांधलेला दोरखंड तुटला आणि त्यावर लोमकळणारा नागेश थराबाहेर रस्त्यावर फेकला गेला.
advertisement
या अपघातात गंभीर जखमी झालेला नागेश आजतागायत आपल्या पायांवर उभा राहिलेला नाही. खाजगी दवाखान्यांपासून ते सरकारी दवाखान्यांमध्ये उपचार घेऊनही त्याचे अपंगत्व कायम आहे. सुरुवातीच्या काळात काही राजकीय मंडळींचे मदतीचे हात पुढे आले त्यातून एक शस्त्रक्रिया पार पडली मात्र एवढ्यावर भागणार नव्हते नागेश ला आणखी उपचारांची आणि त्यासाठी मोठ्या मदतीची आवश्यकता होती तेव्हा मात्र राजकीय पुढाऱ्यांनी हात वर केले शासनाने ही पाठ फिरवली.
advertisement
त्यामुळे आईने होते नव्हते तेवढे सर्व विकून वडिलांनी नातेवाईकांकडून पैसे गोळा करून नागेशवर उपचार केले. डॉक्टरांनी नागेश ला पाच शस्त्रक्रिया सांगितल्या मात्र दोन शस्त्रक्रिया त्याचे कुटुंबीय करू शकले आर्थिक अडचणींमुळे आजही तीन शस्त्रक्रिया अपूर्ण आहेत.
या अपघातात सर्व्हायवल स्पाईन इंजुरीला C5C6 लेव्हल मार लागला. अपघातानंतर चौदा वर्ष मी अंथरुणातच आहे. दोन स्टेन्सिल देण्याचे आम्ही प्रयत्न केले. त्यानंतर हळूहळू माझ्यात सुधारणा झाली. मला नीट होण्याची आणखी तीन स्टेनसिलची गरज आहे, पण ते शक्य होत नाही.
advertisement
या वयात आई-वडिलांना मी सांभाळायला हवं होतं मात्र इथे माझे आई-वडीलच मला सांभाळतात. मी खूप नशीबवान आहे की मला असे कुटुंब मिळालं. असे आई वडील सर्वांनाच मिळावे मात्र माझ्यावर आलेला प्रसंग कोणत्याही गोविंदावर येऊ नये, असं नागेशनं सांगितलं.
advertisement
सर्व गोविंदा पथकांनी सुरक्षित थर लावावे. त्याचबरोबर सरकारने देखील उपाययोजना करणे गरजेचं आहे. सायंकाळी पाच वाजेनंतर गोविंदा जखमी होण्याचे प्रमाण वाढत असतं त्यामुळे सरकारी रुग्णालयात जास्तीत जास्त खातांची व्यवस्था तसेच स्पेशल डॉक्टरांची टीम तयार करून ठेवावी जेणेकरून लवकरात लवकर जखमी गोविंदांवर उपचार करता येते यावर सरकारने लक्ष द्यायला हवं, अशी मागणी नागेशनं केली.
advertisement
सलग दोन शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर डॉक्टरांनी त्याला तिसरी शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे सांगितले त्यासाठी त्याला त्यावेळी अडीच लाखांची आवश्यकता होती तेवढे पैसे त्यावेळेस नसल्याने नागेशच्या उपचार झाला नाही. आमच्याकडील पैसे उपचारात खर्च झाले आहेत. आता पैसे कसे उभे करायचे हा आमच्यापुढे प्रश्न आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यामध्ये आम्हाला मदत करावी अशी मागणी नागेशच्या आई, नलिनी भोईर यांनी केली.
योगेशची जिद्द कायम
14 वर्ष अंथरुणावर खिळून असूनही योगेशची जिद्द कायम आहे. आपण कधी नीट होऊ हे माहिती नाही. पण, अजूनही दहीहंडी फोडण्याची इच्छा कायम आहे, असं नागेशनं सांगितलं.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
14 वर्षांपासून अंथरुणाला खिळून गोविंदा, नेत्यांनी फिरवली पाठ; मुलासाठी आईचं मुख्यमंत्र्यांना साकडं
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement