advertisement

Ro-Ro service : प्रवाशांनी तुडूंब भरलेली रो-रो बोट आदळली जेट्टीला! काळाजाचा ठोका चुकवणारा, Video

Last Updated:

Ro Ro Service : वसई ते भाईंदरदरम्यान प्रायोगिक तत्त्वावर सुरू झालेली रो रो प्रवासी फेरीबोट दोन दिवसात बंद. (राजा मयाल, प्रतिनिधी)

प्रवाशांनी तुडूंब भरलेली रो-रो बोट आदळली जेट्टीला
प्रवाशांनी तुडूंब भरलेली रो-रो बोट आदळली जेट्टीला
वसई, (राजा मयाल, प्रतिनिधी) : मोठा गाजावाजा करत वसई ते भाईंदर दरम्यान सुरू केलेली रो-रो प्रवासी फेरीबोट अवघ्या दोन दिवसांत बंद करण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत वसई खाडीमध्ये वसई ते भाईंदर दरम्यान प्रायोगिक तत्त्वावर 20 फेब्रुवारीपासून रो-रो प्रवासी फेरीबोट सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र, घडलेल्या एका घटनेने सध्या ही सेवा बंद करण्यात आली आहे.
अपघात ठरलं कारण?
वसई ते भाईंदर अशी 20 फेब्रुवारीला सुरू झालेली रो रो सेवा आज बंद झाली आहे. आज शनिवार असल्याने नागरीकांनी वसई जेट्टीवर प्रचंड गर्दी केली होती. मात्र, रो रो सेवा देणारी बोटची दुपारी दोनच्या सुमारास जेट्टीच्या सिमेंट कॉंक्रिटला धडक बसली. बोट कठड्यावर चढल्याने तिचं इंजिन बंद पडले. जेट्टीच्या किनाऱ्यावर बोट अडकल्याने बोटीतील प्रवाशांना काही वेळ बोटीवर ताटकळत राहावे लागले, त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. जेट्टीच्या प्लॅटफॉर्मवर अडकलेली बोट बाहेर काढण्यासाठी दुसऱ्या बोटीचा वापर केला. ज्यावेळी अपघात घडला त्यावेळी बोट भरगच्च प्रवाशांनी भरली होती. सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही. मात्र, या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
advertisement
कशी आहे योजना?
अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या ह्या रो-रो फेरीबोट सेवेमुळे भाईंदर आणि वसई ही शहरे एकमेकांशी जलमार्गाने जोडली गेली आहेत. मेसर्स सुवर्णदुर्ग शिपींग अँड मरीन सर्व्हिसेस प्रा.लि. या कंपनीस ही रो-रो फेरीबोट सेवा चालविण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने परवानगी दिली. एकाच फेरीत 100 प्रवासी आणि 33 गाड्या वाहून नेण्याची फेरीबोटीची क्षमता आहे.
advertisement
ह्या कंपनीला कोकण किनारपट्टीवर राजपुरी, बाणकोट, दाभोळ आणि जयगड या खाड्यांमध्ये रो-रो फेरीबोट सेवा चालविण्याचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. वसई ते भाईंदर या फेरीबोट सेवेकरिता सध्या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी प्रायोगिक तत्त्वावर तिकीट दर ठेवण्यात आले आहेत.
advertisement
प्रवासी आणि वाहनांचा तपशील आणि तिकीट दर : दुचाकी (चालकासह) 60 रुपये, रिकामी तीन चाकी रिक्षा मिनीडोर (चालकासह) 100, 40 रुपये, चारचाकी वाहन (चालकासह) 180 रुपये, मासे, पक्षी, कोंबडी, फळे इ. (प्रति टोपली) व कुत्रा, शेळी, मेंढी (प्रति नग) प्रवासी प्रौढ (12 वर्षावरील) 30 रुपये, तर लहान मुलांसाठी 15 रुपये.
advertisement
सध्या ही फेरीबोट सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरु होणार असली तरी, वाहतूककोंडीचा सामना करीत वसई ते भाईंदर असा रस्त्याने प्रवास करणाऱ्या लोकांना वेळ व इंधनाची बचत करणारा, प्रदूषणमुक्त, पर्यावरणस्नेही व आरामदायी असा जलवाहतूक सेवेचा पर्याय उपलब्ध होणार असल्याने जनतेसाठी ही सेवा नक्कीच दिलासादायक ठरेल, असा विश्वास महाराष्ट्र सागरी मंडळास वाटत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
Ro-Ro service : प्रवाशांनी तुडूंब भरलेली रो-रो बोट आदळली जेट्टीला! काळाजाचा ठोका चुकवणारा, Video
Next Article
advertisement
IND vs WI : 'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
  • संजूला डगआऊटमधून कुणी मेसेज दिला

  • संजूने एकहाती मॅच फिरवली

  • टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचवलं

View All
advertisement