स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यासाठी मॅनेजरची सोडली नोकरी; वडिलांच्या पाठींब्यानं सुरु केला कॅफे, पाहा Video

Last Updated:

नोकरीपेक्षा स्वत:चा व्यवसाय करण्याच स्वप्न अनेक तरूण पाहतात. मात्र, जेव्हा आपण आपल्या व्यवसायासाठी झटतो तेव्हा यश हे आपलंच असतं हे दाखवून दिलं कुणाल परब नावाच्या एका मुलानं.

+
स्वत:चा

स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यासाठी मॅनेजरची सोडली नोकरी; वडिलांच्या पाठींब्यानं सुरु केला कॅफे

मयुरी सर्जेराव, प्रतिनिधी 
 ठाणे : नोकरीपेक्षा स्वत:चा व्यवसाय करण्याच स्वप्न अनेक तरूण पाहतात. पण ते सत्यात उतरवण्यात मेहनतही तेवढीच घ्यावी लागते. मात्र, जेव्हा आपण आपल्या व्यवसायासाठी झटतो तेव्हा यश हे आपलंच असतं हे दाखवून दिलं कुणाल परब नावाच्या एका मुलानं. कुणाल डोंबिवली मधील राहणारा आहे. मेकॅनिकलचं शिक्षण त्यानं पूर्ण केलं, नंतर BMM केलं, पण त्याची ओढ मात्र व्यवसायाकडेच होती. काही वर्ष अनेक कॅफेमध्ये मॅनेजर पदासाठी काम केलं. पण स्वत:चं काहीतरी करून दाखवण्याची जिद्द गप्प बसून देत नव्हती. शेवटी त्याने नोकरी सोडली आणि वडिलांच्या पाठींब्यानं स्वत:चं कॅफे सुरु केला. 'मिनी पॉकेट कॅफे कॅफेचं नाव ठेवलं. डोंबिवली पूर्व येथील श्री समर्थ कृपा, नांदिवली चौकात कुणालचं हे कॅफे आहे.
advertisement
 वडीलांच्या मदतीनं सुरु केलं कॅफे 
कुणाल हा स्वत: एक खवय्या असल्यानं त्याला फूडमध्येच काहीतरी सुरु करायचं होतं. अखेर वडीलांच्या मदतीनं त्यानं छोटसं कॅफे सुरु केलं. कुणाल ने प्रत्येक पदार्थाची किंमत अवघ्या 30 रुपयांपासून ठेवली कारण लोकांना स्वस्तात मस्त पदार्थ खाऊ घालण्याची त्याची इच्छा होती. म्हणूनच त्याने कॅफेचं नावही अगदी तसच निवडलं. कुणालने गोवन पदार्थापासून ते मुंबईच्या स्ट्रीट फूडपर्यंत सगळ्या प्रकारचे पदार्थ ठेवले आहेत. वेज-नॉनवेजमध्येही खूप प्रकारचे खाद्य तो बनवतो. प्रत्येक पदार्थात त्याने काहीतरी नवीन फ्यूजन बनवण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यत: हे सगळे पदार्थ तो स्वत:हा बनवतो.
advertisement
पोळी लाटण्याचं काम ते आज स्वत:चं दुकान, डोंबिवलीच्या बॅगवाली मावशीची अत्यंत प्रेरणादायी कहाणी Video
पोळी पाव, वेज-नॉनवेज मॅगीचे प्रकार, चिकन पॅटीसचे प्रकार, असे अनेक पदार्थ त्याच्याकडे मिळतात. आणि सगळे पदार्थ अगदी खिशाला परवडत असल्यानं कॉलेज विद्यार्थ्यांचा तर हा कट्टाच बनला आहे. अवघ्या 4 ते 5 महिन्यांपूर्वी सुरु केलेल्या आपल्या व्यवसायाला चांगल्याप्रकारे लोकांचा प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे आणखी नवनवीन गोष्टी आणण्याचा प्रयत्न असल्याचंही कुणाल म्हणाला. तसेच नोकरी आणि व्यवसायात तुलना करायची नाहीये. पण जेव्हा आपण व्यवसायात उतरतो तेव्हा आपण नोकरीपेक्षा नक्कीच जास्त मेहनत घेतो कारण ते आपल्याला यशस्वी करून दाखवायचं असतं. व्यवसायात उतरण्याची, मेहनत करण्याची तयारी असेल तर काहीही अशक्य नाही. मराठी माणसानं स्पेशली तरुणांनी इच्छा असेल तर खरच व्यवसायाकडे वळावं, जिद्दीनं केलं तर मराठी माणूस काहीही करू शकतो, असंही कुणाल म्हणाला.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यासाठी मॅनेजरची सोडली नोकरी; वडिलांच्या पाठींब्यानं सुरु केला कॅफे, पाहा Video
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement