पारंपरिक आणि फॅशनचे अनोखे कॉम्बिनेशन; शिवण कौशल्यातून साकारली ब्लाऊजवर भारताच्या विविध भागांची संस्कृती
- Published by:News18 Marathi
Last Updated:
ठाण्यातील एक तरुणी डिझाईनिंग कौशल्यातून भारताच्या विविध संस्कृती ब्लाऊजवर डिझाईन करून साकारत आहे.
लतिका तेजाळे
मुंबई : महिलांचे एथनिक लूक नेहमीच फॅशनमध्ये असतात. आणि आकर्षक पारंपारिक लुक तयार करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे अप्रतिम साडी ब्लाऊज डिझाईन निवडणे. साडी जरी सादी सिंपल असली तरी साडीचा ब्लाऊज आकर्षक असणे गरजेचे असते. मात्र, बऱ्याच वेळा आपल्या मना सारखा ब्लाऊज मिळत नाही. त्यामुळे हीच गोष्ट लक्षात घेऊन ठाण्यातील एक तरुणी डिझाईनिंग कौशल्यातून भारताच्या विविध संस्कृती ब्लाऊजवर डिझाईन करून साकारत आहे.
advertisement
ठाण्यातील या तरूणीचे प्रियांका लांजेकर असे आहे. इतर मुलींप्रमाणेच तिला देखील फॅशनेबल लुक करण्याची आवड आहे. 2013 मध्ये प्रियंका आणि तीची आई या दोघींनी मिळून आनंदा क्रिएशन नामक ब्रँड सुरू केला. ज्यात त्या महिलांचे डिझायनर ब्लाऊज तयार करत आहेत. प्रियंका पूर्वी एक उत्तम डान्सर होती. त्यामुळे भारतातील विविध ठिकाणचे नृत्य स्वरूप तिला माहित आहेत. त्यावरून प्रियांकाने आपल्या शिवण कौशल्यातून ब्लाऊजद्वारे भारताच्या विविध ठिकाणच्या विशिष्ट संस्कृती दर्शवल्या आहेत.
advertisement
प्रियंकाच्या मते प्रत्येक ब्लाऊज मागे कहाणी असते. ब्लाऊज तयार करण्यासाठी लागणारा कापड, त्यावर होणारे सुंदर वर्क, ब्लाऊज तयार करण्यासाठी लागणारा कालावधी एक नवीन कहाणी तयार करत असते. त्याच प्रमाणे आनंदा क्रिएशनमध्ये भारताच्या विविध भागातील संस्कृती ब्लाऊज वर रेखाटून मिळते. यांच्या कलेक्शनमध्ये ओडिसी नृत्याची पारंपारिक झलक पाहायला मिळते. ब्लाऊजवर ओडिसाचा पारंपारिक नृत्य करणाऱ्या स्त्रीचा चेहरा त्यांनी हाताने रंगवून, त्याला ओडिसी गजरा धाग्यांनी डिझाईन केला आहे. या नृत्य प्रकारात कंबरपट्ट्याला अधिक महत्त्व असते. त्यामुळे त्या कंबरपट्ट्याचे डिझाईन धाग्यांनी ब्लाऊजच्या बाजूंना केली गेली आहे.
advertisement
त्याचप्रमाणे भारताच्या दक्षिण भागात चुन्याने दरवाजात रांगोळी काढण्याची एक परंपरा आहे. तर त्या कन्सेप्टचा विचार करून खणाच्या ब्लाऊज वर पाठीला सुंदर रांगोळीचे डिझाईन धाग्यांनी तयार केली आहे. त्यामुळे सध्या आनंदा क्रिएशनला भारतातच नव्हे तर भारताबाहेरही पसंती मिळत आहे, अशी माहिती प्रियांका लांजेकर यांनी दिली आहे.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
January 19, 2024 12:36 PM IST
मराठी बातम्या/ठाणे/
पारंपरिक आणि फॅशनचे अनोखे कॉम्बिनेशन; शिवण कौशल्यातून साकारली ब्लाऊजवर भारताच्या विविध भागांची संस्कृती