फॅशन जुनी पण ट्रेंड नवा! मुंबईची आदिती जपतेय खणाची संस्कृती, Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
खणाच्या कपड्याची संस्कृती जपून ठेवण्यासाठी मुंबईतील तरुणीने एक कपड्यांचा ब्रँड तयार केलाय.
लतिका तेजाळे, प्रतिनिधी
मुंबई: आजवर खण हा कपड्यांचा प्रकार आपण आपल्या आजीकडे पाहिला असेल. पूर्वीच्या महिला काष्टा साडी नेसून खणाची चोळी परिधान करत असत. परंतु आता चोळीच्या खणाचा नियमित वापर कमी होत आहे. हीच खणाच्या कपड्याची संस्कृती जपून ठेवण्यासाठी मुंबईतील आदिती मगदूम यांनी एक कपड्यांचा ब्रँड तयार केलाय. खणाच्या कपड्यांपासून विविध कापडी वस्तू तयार करत आहेत.
advertisement
भांडुपच्या दातार कॉलनी परिसरात असलेले कला बाय नंदा कपड्यांचे दुकान आहे. आदिती मगदुम व तिची आई नंदा मगदूम या दोघी मिळून हे दुकान चालवतात. आदिती ही तरुणी प्रोडक्ट डिझायनर आहे. कॉलेजमध्ये असताना तिने खणाच्या कपड्यांच्या विविध वस्तू तयार करणाऱ्या या ब्रँडची सुरुवात केली.
advertisement
खण्याचा कपड्यांपासून तयार केलेल्या वस्तू
कला बाय नंदा हा ब्रँड बनला असून खणाच्या कपड्यांपासून विविध वस्तू तयार करतात. यात खणाचे पर्स 100 रुपयांपासून खरेदी करता येतील. दाराचे तोरण 800 रुपये, बटवा व मोबाईल पाऊच 100 रुपयांत खरेदी करता येतील. खणाची फॅब्रिक ज्वेलरी 400 व खाणची टोपी 450 रुपयात खरेदी करता येतील. या खणाच्या कपड्यापासून तयार केलेल्या वस्तू अगदी 100 रुपयांपासून खरेदी करता येतील.
advertisement
खण हा प्रकार फक्त चोळीसाठीच मर्यादित न ठेवता, त्यापासून विविध होम डेकोरेशनच्या वस्तू केल्या जातात. असाच उद्देश कला बाय नंदाचा आहे, अशी माहिती आदिती मगदूम यांनी दिली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 18, 2024 2:47 PM IST