डोंबिवलीकर पाणी जपून वापरा! गुरुवारी बंद राहणार शहरातील पाणीपुरवठा
- Published by:Aaditi Datar
Last Updated:
कल्याण- डोंबिवलीकरांसाठी 6 जूनचा दिवस डोकेदुखीचा ठरू शकतो. कारण गुरुवारी कल्याण आणि डोंबिवलीतील काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
डोंबिवली: राज्यातील बहुतांश भागात पाणीटंचाईची समस्या वाढताना दिसत आहे. काही ठिकाणी आठवड्यातून दोनदा पाणी कपात होत आहे. यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. कल्याण- डोंबिवलीकरांसाठी 6 जूनचा दिवस डोकेदुखीचा ठरू शकतो. कारण गुरुवारी कल्याण आणि डोंबिवलीतील काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्याचा वापर काटकसरीने करावा आणि जास्तीचे पाणी साठवून ठेवावे, असे आवाहन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.
या भागात येणार नाही पाणी
कल्याण डोंबिवलीकरांना पाणी पुरवठा करणाऱ्या नेतिवली आणि बारावे या दोन मुख्य जलशुध्दीकरण केंद्राच्या देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे कल्याण पूर्व, पश्चिम, डोंबिवली पूर्व व पश्चिम आणि परिसरातील पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन पालिकेने आव्हान केले आहे. 6 जूनला सकाळी 8 ते सायंकाळी 6 या काळात पाणीपुरवठा बंद असेल, अशी माहिती कार्यकारी अभियंता अशोक घोडे यांनी दिली आहे
advertisement
पाणीकपातीमुळे गृहिणींमध्ये रोष
कल्याण व डोंबिवली या शहरांना होणारा पाणीपुरवठी गुरुवारी तब्बल 10 तास बंद राहणार आहे. त्यामुळे घरातली कामे करायची कशी? असा सवाल महिलांकडून व्यक्त होतोय. आधीच काही भागात आठवड्यातून एकदा पाणी कपात केली जाते. त्यात पाणी बंद राहणार असल्याने गृहिणींकडून नाराजी व्यवक्त होत आहे.
यासाठी होणार पाणीकपात
कल्याण व डोंबिवली या शहरांना पालिकेकडून नेतिवली, बारावे येथील जलशुध्दीकरण केंद्रातून पाणीपुरवठा केला जातो. पावसाळ्याच्या तोंडावर या जलशुध्दीकरण केंद्रातून होणाऱ्या मुख्य जलवाहिनीवरील तसेच पोहच जलवाहिनींवरील पाणी गळती थांबविण्याचे काम 6 जूनला करण्यात येणार आहे.
Location :
First Published :
June 05, 2024 9:46 PM IST