Dahihandi 2025: गोविंदा आला रे! मुंबईतील महिला गोविंदा पथक, यंदा लावणार इतके थर
- Reported by:Shivani Dhumal
- local18
- Published by:Vrushali Kedar
Last Updated:
Dahihandi 2025: दहीहंडीच्या उत्सवात गोविंदा उंच दहीहंडी फोडतात. परंपरेने पुरुषप्रधान राहिलेल्या दहीहंडीच्या उत्सवात आता महिलाही आपली छाप पाडू लागल्या आहेत.
ठाणे: दहीहंडी हे श्रावणातील मुख्य आकर्षण असते. दहीहंडीच्या उत्सवाला फार प्राचीन परंपरा आहे. सध्या देशभरात कृष्ण जन्माष्टमीची तयारी सुरू आहे. भारतातील प्रत्येक राज्यात कृष्ण जन्माष्टमी वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते आणि दहीहंडी देखील फोडली जाते. मुंबई आणि गुजरातमध्ये दहीहंडीला विशेष महत्त्व आहे. दहीहंडीच्या उत्सवात गोविंदा उंच दहीहंडी फोडतात. परंपरेने पुरुषप्रधान राहिलेल्या दहीहंडीच्या उत्सवात आता महिलाही आपली छाप पाडू लागल्या आहेत.
यावर्षी कृष्ण जन्माष्टमी 15 ऑगस्ट रोजी आहे त्यामुळे 16 ऑगस्ट रोजी दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले जाईल. या पार्श्वभूमीवर कुर्ल्यातील 'आराध्य महिला गोविंदा पथका'ने एक नवीन उपक्रम हाती घेतला आहे. महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी या सर्व महिलांनी एकत्र येऊन गोविंदा पथक तयार केले असून त्यांनी दहीहंडी फोडण्यासाठी तयारी सुरू केली आहे.
advertisement
कुर्ल्यामधील 'आराध्य महिला गोविंदा' पथकाची स्थापना 2012 साली झाली आहे. या पथकात एकूण 100 मुली आणि महिला आहेत. पथकाच्या प्रशिक्षक चित्रा संधू सध्या रोज प्रशिक्षण देत आहेत. हे पथक दरवर्षी पाच थर लावते.
याबाबत चित्रा संधू म्हणाल्या, "गोरक्षनाथ महिला दहीहंडी पथक' हे जगातील पहिलं महिला गोविंदा पथक कुर्ल्यातूनच नावारुपाला आलं होतं. यातूनच प्रेरणा घेऊन आम्ही आमच्या महिला पथकाची पायाभरणी केली आहे. आमच्या गोविंदा पथकात दहा ते पंचेचाळीस या वयोगटातील मुली आणि महिला आहेत. मुंबई शहरासह सोलापूर, बार्शी अशाठिकाणी देखील हे महिलापथक सादरीकरण करण्यासाठी जाते."
advertisement
मुंबई, ठाणे येथील महिलांच्या गोविंदा पथकाला दरवर्षी विशेष मान देण्यात येतो. यानिमित्ताने दररोज पेक्षा काहीतरी वेगळं करण्याचे प्रोत्साहन देखील महिलांना मिळते. परंपरा व संस्कृती जपण्याच्या उद्देशाने या गोविंदा पथकांकडून मानवी मनोऱ्यांच्या रचनेसह देखाव्याचे सादरीकरण देखील केले जाते. त्यातून सामाजिक संदेशही दिले जातात.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
Aug 05, 2025 12:18 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
Dahihandi 2025: गोविंदा आला रे! मुंबईतील महिला गोविंदा पथक, यंदा लावणार इतके थर







