सुंदर रंगीबेरंगी पणत्या अन् दिवे, फक्त 5 रुपयांपासून, ठाण्यात कुठं कराल खरेदी?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Sakshi Sushil Patil
Last Updated:
यंदा ठाण्यात वेगवेगळ्या प्रकारच्या पणत्या पाहायला मिळत आहेत. या पणत्यांमध्ये श्रीराम लिहिलेला पणत्या, त्यासोबत हँगिंग पणत्या, मोर, हत्ती आणि हंस यांचा आकार असणरे दिवे आणि पणत्या मार्केटमध्ये उपलब्ध झाले आहेत.
साक्षी पाटील, प्रतिनिधी
ठाणे : दिवाळीचा उत्साह मार्केटमध्ये ओसंडून वाहत आहे. दिवाळी म्हटलं की येते पणत्या आणि दिव्यांची रोषणाई. हल्ली मातीच्या पणत्यांमध्ये सुद्धा अनेक वेगवेगळे प्रकार आलेले आहेत. सध्या ठाणे मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात दिवे आणि पणत्या उपलब्ध झाल्या आहेत. यंदा ठाण्यात वेगवेगळ्या प्रकारच्या पणत्या पाहायला मिळत आहेत. या पणत्यांमध्ये श्रीराम लिहिलेला पणत्या, त्यासोबत हँगिंग पणत्या, मोर, हत्ती आणि हंस यांचा आकार असणारे दिवे आणि पणत्या मार्केटमध्ये उपलब्ध झाले आहेत. ठाणे मार्केटमध्ये पणत्यांची किंमत फक्त 5 रुपयांपासून ते 500 रुपयांपर्यंत आहे. अनेक जण घर सजवण्यासाठी रांगोळीवर ठेवण्यासाठी या पणत्यांचा उपयोग करतात.
advertisement
ठाण्यातील राम मारुती रोड इथे असणाऱ्या रोज नर्सरी या ठिकाणी साध्या गोल मातीच्या पणत्या फक्त 5 रुपयांपासून सुरू होतात. त्याचसोबत, यांच्याकडे वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये पणत्या उपलब्ध झाल्या आहेत. यामध्ये हँगिंग पणत्या विशेष करून लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. गॅलरीमध्ये लावण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. यांची किंमत फक्त 100 रुपयांपासून सुरू होत आहे.
advertisement
हँगिंग पणत्यांसोबतच विविध नक्षीकाम असणाऱ्या आणि रंगीबेरंगी पणत्या सुद्धा इथे उपलब्ध आहेत. यांची किंमत सुद्धा 150 रुपयांपासून सुरू होत आहे. तुम्हाला जर सहा रंगीबेरंगी पणत्या विकत घ्यायचे असतील तर त्यांची किंमत फक्त 120 रुपये असून दाराजवळ ठेवण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. हे सगळे दिवे आणि पणत्या कोलकत्त्यावरून मागवलेले असल्यामुळे, या पणत्या बनवताना कोलकत्याची माती वापरलेली आहे.
advertisement
'आम्ही या सगळ्या पणत्या कोलकत्ता वरून आणल्या आहेत. माती चांगली असल्यामुळे या पणत्यांना तडे जाणार नाही. त्यामुळे या पणत्या तुम्ही कितीही दिवस वापरू शकता' असे दुकानदार मौसम सिंग यांनी सांगितले.
तर मग मित्रांनो तुम्हालाही यावर्षी दिवाळीत या युनिक आणि इको फ्रेंडली पणत्या वापरायच्या असतील तर नक्की ठाण्यातील या दुकानाला भेट द्या.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
October 26, 2024 6:24 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
सुंदर रंगीबेरंगी पणत्या अन् दिवे, फक्त 5 रुपयांपासून, ठाण्यात कुठं कराल खरेदी?