फक्त 100 रुपयांमध्ये खरेदी करा टी-शर्ट; कल्याणमधील एवढे स्वस्त ठिकाण पाहा

Last Updated:

महिलांप्रमाणेच पुरुषांनाही रोज बदलून नवनवीन ट्रेंडी कपडे घालण्याची इच्छा असते. त्यामुळे तुम्हाला फक्त 100 रुपयांमध्ये टी-शर्टची खरेदी कुठे करता येईल याबद्दल माहिती देणार आहेत. 

+
News18

News18

लतिका तेजाळे, प्रतिनिधी
ठाणे : महिलांप्रमाणेच पुरुषांनाही रोज बदलून नवनवीन ट्रेंडी कपडे घालण्याची इच्छा असते. त्यामुळे आता वेगवेगळे प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. मुंबईतील सीएसटी, दादर, ठाणे आणि कल्याणमधील बाजारपेठा ह्या पुरुषांच्या कपड्यांचा स्वस्त बाजारपेठांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे कल्याणमधील बाजारपेठमध्ये तुम्हाला फक्त 100 रुपयांमध्ये टी-शर्टची खरेदी कुठे करता येईल याबद्दल माहिती देणार आहेत. 
advertisement
स्वस्त दरात खरेदी करा टी-शर्ट
कल्याणमधील चिंचपाडा परिसरात असलेले मॅडमॅन दुकानात मेन्स वेअरमध्ये विविध प्रकारचे कपडे अगदी स्वस्त दरात खरेदी करता येतील. या ठिकाणी प्रीमियम कॉलिटीचे टी-शर्ट फक्त 100 रुपयात खरेदी करता येतील. इतर बाजारपेठांमध्ये टी-शर्ट अधिक तर 400 ते 500 रुपयांपासून मिळतात. पण कल्याणमधील मॅडमॅन नामक या दुकानात 100 रुपयांच्या टी-शर्टमध्ये अनेक स्टायलिश प्रिंटचा पर्याय खरेदीदारांना मिळतो. हेच 100 रुपयांच्या टी-शर्ट मध्ये वेगवेगळ्या साईज रेंज सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत.
advertisement
आवडच बनली व्यवसाय, 22 वर्षांचा युवा उद्योजक 400 रुपयांत देतोय 30 हजारांचा परफ्यूम
कल्याणच्या मॅडमॅन दुकानात 100 रुपयांच्या टी-शर्ट व्यतिरिक्त 300 रुपयांपासून पुरुषांच्या फॉर्मल पॅन्ट देखील मिळतील. त्यासोबतच 500 रुपयात सध्या ट्रेंडिंग असलेले पुरुषांचे शर्ट देखील खरेदी करता येईल. मुलांचे ओवर साईज ट्रेडिंग टीशर्ट आर्टिकल या ठिकाणी हजार रुपयात तीन खरेदी करता येईल. महिलांप्रमाणे पुरुषांचे देखील कपडे आपल्याला स्वस्तात मिळावे अशी इच्छा प्रत्येक पुरुषाची असते. अशांसाठी हे ठिकाण खरेदीसाठी बेस्ट पर्याय आहे, अशी माहिती दुकानाचे मालक केतन पष्टे यांनी दिली आहे.
मराठी बातम्या/ठाणे/
फक्त 100 रुपयांमध्ये खरेदी करा टी-शर्ट; कल्याणमधील एवढे स्वस्त ठिकाण पाहा
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement