advertisement

Summer Special Trains: उन्हाळी स्पेशल ट्रेनची घोषणा! नाशिक, मनमाडकरांना मोठा दिलासा; असा असेल टाईमटेबल

Last Updated:

उन्हाळ्यांच्या सुट्ट्यांमध्ये मध्य रेल्वेकडून परराज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर एक्सप्रेस सोडल्या जातात. महाराष्ट्रातून परराज्यांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे. आता अशातच विशेष उन्हाळी रेल्वेची घोषणा केली आहे.

Panvel to Alipurduar Amrit Bharat Express full schedule
Panvel to Alipurduar Amrit Bharat Express full schedule
नाशिक: उन्हाळ्यांच्या सुट्ट्यांसाठी परराज्यांमध्ये जाणाऱ्या एक्सप्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळते. आता अशातच उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मध्य रेल्वेकडून विशेष उन्हाळी रेल्वे चालवल्या जाणार आहेत. दोन एक्सप्रेस बद्दलची माहिती समोर आली असून मध्य रेल्वेकडून दोन एक्सप्रेसचं टाईमटेबल जाहीर करण्यात आलं आहे. मुंबई सीएसएटी ते गोरखपूर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस ते समस्तीपूर अशा दोन एक्सप्रेसच्या दोन घोषणा करत त्यांचा टाईम टेबल सुद्धा जाहीर केलेला आहे. यामुळे परराज्यामध्ये जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबई सीएसएमटी ते गोरखपूर हॉलिडे स्पेशल एक्सप्रेस दररोज रात्री 10.30 वाजता मुंबई सीएसएमटीहून सुटणार असून गोरखपूरला तिसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता पोहोचणार आहे. ही समर हॉलिडे स्पेशल एक्सप्रेस 15 मार्च ते 30 एप्रिल या कालावधीमध्ये चालवली जाणार आहे. तर, गोरखपुरवरून दररोज दुपारी 02.30 वाजता सुटणार असून मुंबई सीएसएमटी स्थानकावर तिसऱ्या दिवशी मध्यरा‍त्री 12.30 मिनिटांनी पोहोचणार आहे. ही ट्रेन महाराष्ट्रामध्ये दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड जंक्शन, जळगांव आणि भुसावळ या स्थानकावर थांबणार आहे. या हॉलिडे स्पेशल एक्सप्रेसमुळे प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
advertisement
यासोबतच आणखी एक हॉलिडे स्पेशल एक्सप्रेस उन्हाळ्याच्या सुटीच्या दिवसांमध्ये धावणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस ते समस्तीपूर (बिहार) ही सुद्धा एक्सप्रेस सुटीच्या दिवसांमध्ये धावणार आहे. साप्ताहिक स्पेशल एसी एक्सप्रेस 21 मार्च ते 14 जुलै या दिवसांमध्ये धावणार आहे. प्रत्येक मंगळवारी दुपारी 12.15 वाजता ही एक्सप्रेस लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटणार आहे. तर हिच एक्सप्रेस समस्तीपूरला बुधवारी रात्री 11.45 वाजता पोहोचेल. तर, 23 मार्च ते 16 जुलै या दिवसांमध्ये ही साप्ताहिक स्पेशल एसी एक्सप्रेस प्रत्येक गुरूवारी पहाटे 03.00 वाजता ही एक्सप्रेस समस्तीपूरवरून सुटणार आहे. तर हिच एक्सप्रेस लोकमान्य टिळक टर्मिनसला शुक्रवारी दुपारी 04.25 वाजता पोहोचणार आहे.
advertisement
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आणखी एक एक्सप्रेस धावणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस ते बनारस या मार्गावर आणखी एक समर हॉलिडे स्पेशल एक्सप्रेस धावणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनसवरून आठवड्याच्या प्रत्येक बुधवारी आणि गुरूवारी दुपारी 12.15 वाजता सुटेल. तर, बनारसला दुसऱ्या दिवशी रात्री 11.30 वाजता पोहोचेल. तर प्रत्येक आठवड्याच्या शुक्रवारी आणि शनिवारी ही ट्रेन बनारस स्थानकावरून पहाटे 5.30 वाजता सुटणार आहे. तर दुसऱ्या दिवशी सायंकाळी 4.40 मिनिटांनी लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल. लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, जळगांव, भुसावळ जंक्शन या स्थानकांवर महाराष्ट्रातील या स्थानकांवर ही ट्रेन थांबणार आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Summer Special Trains: उन्हाळी स्पेशल ट्रेनची घोषणा! नाशिक, मनमाडकरांना मोठा दिलासा; असा असेल टाईमटेबल
Next Article
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त, जाणून घ्या नवे दर
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त
  • लठ्ठपणा आणि मधुमेहावर आता स्वस्त उपचार

  • किमतीत ६० टक्क्यांपर्यंत मोठी घट होणार

  • जाणून घ्या किती स्वस्त मिळणार औषध

View All
advertisement