Tree Top Walk: 'पैसा ही पैसा होगा'! 'ट्री टॉप वॉक'ला पर्यटकांचा उदंड प्रतिसाद, महापालिकेच्या तिजोरीत भर

Last Updated:

Tree Top Walk: महानगरपालिकेच्या डी विभागांतर्गत असलेल्या फिरोजशहा मेहता उद्यान आणि कमला नेहरू उद्यान याठिकाणी हा प्रकल्प आहे. या मार्गाची लांबी 485 मीटर आणि रुंदी 2.4 मीटर आहे.

Tree Top Walk: 'पैसा ही पैसा होगा'! 'ट्री टॉप वॉक'ला पर्यटकांचा उदंड प्रतिसाद, महापालिकेच्या तिजोरीत भर
Tree Top Walk: 'पैसा ही पैसा होगा'! 'ट्री टॉप वॉक'ला पर्यटकांचा उदंड प्रतिसाद, महापालिकेच्या तिजोरीत भर
मुंबई: मुंबईकरांना दररोजच्या धावपळीच्या आयुष्यातून थोडासा निवांतपणा घेता यावा आणि निसर्गाचा आनंद लुटता यावा, यासाठी मुंबई महानगरपालिकेने मलबार हिलच्या उतारावर 'ट्री टॉप वॉक' बांधला आहे. या मार्गाला मुंबईकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला असून महानगरपालिकेच्या तिजोरीत 50 लाख रुपये महसुलाची भर पडली आहे. मार्च 2025 पासून सुरू झालेल्या या मार्गाला जुलैपर्यंत 1 लाख 96 हजार 190 पर्यटकांनी भेट दिली आहे. ऑगस्टमध्ये ही संख्या दोन लाखांच्याही पार जाण्याची शक्यता मुंबई महापालिका अधिकाऱ्याकडून वर्तवण्यात येत आहे.
महानगरपालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'ट्री टॉप वॉक' नागरिकांसाठी खुला केल्यानंतर मार्च ते जुलैदरम्यान 1 लाख 96 हजार 190 पर्यटकांनी भेट दिली. विशेष म्हणजे यामध्ये 880 विदेशी पर्यटकांचाही समावेश होता. मे आणि एप्रिल या महिन्यात पर्यटकांची संख्या प्रत्येकी 50 हजारांच्यावर होती.
advertisement
सिंगापूरमधील 'ट्री टॉप वॉक' या संकल्पनेशी साधर्म्य असलेला हा प्रकल्प मुंबईत पहिल्यांदाच विकसित करण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या डी विभागांतर्गत असलेल्या फिरोजशहा मेहता उद्यान आणि कमला नेहरू उद्यान याठिकाणी हा प्रकल्प आहे. या मार्गाची लांबी 485 मीटर आणि रुंदी 2.4 मीटर आहे. या मार्गावर एका ठिकाणी समुद्राचं अथांग रूप न्याहाळण्यासाठी 'सी व्हीविंग डेक'देखील बांधण्यात आला आहे.
advertisement
मुंबईच्या समृद्ध जैवविविधतेचे दर्शन घडवणाऱ्या 100 हून अधिक वनस्पतींसह निरनिराळे पक्षी न्याहाळण्याची संधीही याठिकाणी मिळत आहे. 'ट्री टॉप वॉक' ला भेट देणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी 25 रुपये, तर विदेशी पर्यटकांसाठी 100 रुपये तिकीट आकारलं जात आहे.
'ट्री टॉप वॉक' येथे एका वेळी 200 जणांना प्रवेश दिला जातो. ही सुविधा पहाटे 5 ते रात्री 9पर्यंत उपलब्ध असते. https://naturetrail.mcgm.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन तिकीट काढण्याचा पर्याय देण्यात आला आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Tree Top Walk: 'पैसा ही पैसा होगा'! 'ट्री टॉप वॉक'ला पर्यटकांचा उदंड प्रतिसाद, महापालिकेच्या तिजोरीत भर
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement