नाशिक महापालिकेला दणका! तपोवन परिसरातील वृक्षतोड प्रकरणावर राष्ट्रीय हरित लवादाचा मोठा निर्णय
- Reported by:Laxman Ghatol
- Written by:Ajit Bhabad
Last Updated:
Tapovan Vruskshatod : तपोवन परिसरातील वृक्षतोड प्रकरणात नाशिक महापालिकेला मोठा धक्का बसला असून, राष्ट्रीय हरित लवादाने महत्वाचा निर्णय दिला आहे.
लक्ष्मण घाटोळ (प्रतिनिधी), नाशिक : तपोवन परिसरातील वृक्षतोड प्रकरणात नाशिक महापालिकेला मोठा धक्का बसला असून, राष्ट्रीय हरित लवादाने (ग्रीन ट्रिब्युनल) या भागातील प्रस्तावित वृक्षतोडीला २० फेब्रुवारीपर्यंत स्थगिती दिली आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत एकही झाड तोडू नये, असे स्पष्ट निर्देश लवादाने दिले आहेत. नुकत्याच झालेल्या सुनावणीत महापालिकेसह संबंधित यंत्रणांना संपूर्ण आणि सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून, पुढील सुनावणीपर्यंत वृक्षतोडीवर तात्पुरती बंदी कायम ठेवण्यात आली आहे.
तपोवन वृक्षतोड प्रकरण नेमके काय आहे?
तपोवन हा नाशिकमधील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील परिसर मानला जातो. गोदावरी नदीच्या काठालगत असलेल्या या भागात मोठ्या प्रमाणावर जुनाट, दाट आणि जैवविविधतेने समृद्ध अशी झाडे आहेत.
मात्र, महापालिकेने आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या परिसरात रस्ते रुंदीकरण, विकासकामे आणि सौंदर्यीकरणाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. या प्रस्तावानुसार शेकडो झाडे तोडण्याची परवानगी घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.
advertisement
मात्र, या वृक्षतोडीमुळे पर्यावरणावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेऊन पर्यावरणप्रेमी नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि काही स्वयंसेवी संस्थांनी याला तीव्र विरोध दर्शवला.
हरित लवादाचे स्पष्ट निर्देश
या प्रकरणाची गंभीर दखल घेत हरित लवादाने महापालिकेला कठोर निर्देश दिले आहेत. पुढील सुनावणीपर्यंत तपोवन परिसरात कोणत्याही प्रकारची वृक्षतोड करण्यात येऊ नये, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.
advertisement
दरम्यान, लवादाच्या निर्णयामुळे पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र, हे केवळ तात्पुरते दिलासादायक पाऊल असून, पुढील सुनावणीत काय निर्णय होतो? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Jan 20, 2026 11:14 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नाशिक महापालिकेला दणका! तपोवन परिसरातील वृक्षतोड प्रकरणावर राष्ट्रीय हरित लवादाचा मोठा निर्णय







