advertisement

 नदी कोरडी झाली, गरिबी उघडी पडली! 500- 600 रुपयांसाठी जीवाशी खेळ; बेरोजगारीचं भयाण वास्तव

Last Updated:

मृत व्यक्तींच्या अस्थि विसर्जनासोबत वाहून गेलेले सोन्या-चांदीचे मणी शोधण्यासाठी महिला आणि तरुण आपला जीव धोक्यात घालत आहेत.

News18
News18
अविनाश कानडजे, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : माणूस पोटासाठी काय करेल याचा नेम नाही... छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये सध्या असाच एक धक्कादायक प्रकार समोर येतोय. गोदावरी नदीचं पाणी कमी झालंय आणि या उघड्या पडलेल्या पात्रात आता 'सोनं' शोधण्यासाठी शेकडो लोक गाळात उतरले आहेत. मृत व्यक्तींच्या अस्थि विसर्जनासोबत वाहून गेलेले सोन्या-चांदीचे मणी शोधण्यासाठी महिला आणि तरुण आपला जीव धोक्यात घालत आहेत.
advertisement
पैठणचा हा गोदावरी तट... श्रद्धा आणि श्रमाचा हा विचित्र मेळ इथे पाहायला मिळतोय. नाथषष्ठीसाठी पाणी कमी होताच या घाटावर एक वेगळीच स्पर्धा सुरू होते. ती म्हणजे सोन्याचे कण वेचण्याची. ​हे केवळ सोनं शोधणं नाही, तर हा पोटाचा संघर्ष आहे. दररोज या ठिकाणी दशक्रिया विधी पार पडतात. परंपरेनुसार मृत व्यक्तीसोबत ठेवलेलं सोनं-चांदी राखेसोबत विसर्जित केलं जातं. आता हेच दागिने, मणी किंवा अंगठ्या शोधण्यासाठी महिला आणि तरुण भर उन्हात गाळात उतरले आहेत.
advertisement

नाथषष्ठीमुळे गोदावरीचे पाणी कमी; ​नदीचे पात्र कोरडे पडल्याने सोनं शोधण्यासाठी शेकडोंची गर्दी

  • 500- 600  रुपयांच्या रोजंदारीसाठी जीवाचा धोका
  • ​हाताला इजा होऊ नये म्हणून बोटांना चिकट टेपचा आधार
  • ​बेरोजगारीमुळे तरुणांची गाळाकडे धाव
आम्ही सकाळी 8 पासून इथे असतो. हाताला काम नाही म्हणून हे करावं लागतं. दिवसभरात 500- 600 रुपये सुटतात, त्यातून घर चालतं. हाताला काचा लागू नयेत म्हणून बोटांना टेप लावतो. हाताच्या बोटांना साधा 'चिकट टेप' लावून, काचांच्या तुकड्यांतून हे लोक सोन्याचे कण वेचत आहेत. 500 रुपयांच्या रोजंदारीसाठी चाललेला हा 'जीवघेणा शोध' प्रशासकीय अनास्था आणि वाढत्या बेरोजगारीचं विदारक दर्शन घडवत आहे. फक्त स्थानिक नाही तर बाहेर जिल्ह्यातून देखील लोक याठिकाणी येतात, वर्षभर हा संघर्ष सुरू असतो, याठिकाणी फक्त सोनं शोधणारे नाही तर, खरेदी करणारे देखील उभे असतात अशा प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिल्या...
advertisement

श्रद्धेच्या पैठण नगरीत पोटाच्या खळगीसाठी सोनियाचा संघर्ष

ज्या हातांना कारखान्यात किंवा शेतात असायला हवं होतं, ते हात आज ५०० रुपयांसाठी जीव धोक्यात घालून चिखल उपसत आहेत. श्रद्धेच्या पैठण नगरीत पोटाच्या खळगीसाठी सुरू असलेला हा 'सोनियाचा संघर्ष' व्यवस्थेला चपराक लगावणारा आहे.
हे ही वाचा :
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
 नदी कोरडी झाली, गरिबी उघडी पडली! 500- 600 रुपयांसाठी जीवाशी खेळ; बेरोजगारीचं भयाण वास्तव
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement