Nashik Crime: 21 दिवसात 26 जणांना अटक, 'हे' आहे महाराष्ट्रातील सर्वात लाचखोर शहर
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
लाचखोरीच्या प्रकरणामध्ये नाशिक जिल्हा नंबर एक ठरला आहे. 2026 च्या पहिल्या महिन्यातच नाशिक विभागाने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे.
नाशिक: लाचखोरीच्या प्रकरणामध्ये नाशिक जिल्हा अग्रेसर ठरला आहे. 2026 या वर्षामध्ये फक्त एका महिन्यातच नाशिक विभागाने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. लाचखोरीच्या प्रकरणामधला आकडा पाहून नक्कीच कोणाचेही डोळे फिरतील एवढा हा आकडा आहे. 1 जानेवारी 2026 ते 21 जानेवारी 2026 या 21 दिवसांमध्ये नाशिक विभागांत लाचखोरीच्या सर्वाधिक घटना फार कमी आहे. इतर विभागाच्या तुलनेमध्ये हा आकडा सर्वाधिक आहे. तर मुंबईमध्ये गेल्या 21 दिवसांमध्ये एकही लाचखोरीची घटना घडलेली नाही. लाचखोरीच्या घटनेमध्ये नाशिक विभाग फक्त 2026 मध्येच नाही तर, 2024 मध्येही अव्वल ठरला होता.
लाचखोरीच्या गुन्ह्यांमध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये 13 गुन्ह्यांमध्ये 26 आरोपींना अटक केली आहे. तर विभागांबद्दल सांगायचे तर, ठाणे विभागामध्ये 7 गुन्ह्यांमध्ये 10 आरोपींना अटक, पुणे विभागामध्ये 6 गुन्ह्यांमध्ये 6 आरोपींना अटक, छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये 6 गुन्ह्यांमध्ये 7 आरोपींना अटक, ठाणे विभागामध्ये 7 गुन्ह्यांमध्ये 10 आरोपींना अटक, नागपूर विभागामध्ये 4 गुन्ह्यांमध्ये 5 आरोपींना अटक आणि नांदेड विभागामध्ये 3 गुन्ह्यांमध्ये 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुंबईकरांच्या दृष्टीने एक आनंदाची बातमी म्हणावी लागेल. मुंबईमध्ये 21 दिवसांत एकही लाचखोरीचे प्रमाण घडलेले नाही. या बद्दलचे वृत्त दैनिक दिव्य मराठीने आज प्रसारित केले आहे.
advertisement
2025 मध्ये वेगवेगळ्या विभागांकडून तब्बल 8 कोटी 42 लाख 23 हजार 240 रूपयांची मालमत्ता गोठण्याची प्रक्रिया पार पडली गेली. नगर विकास, परिवहन कृषीसह अशा वेगवेगळ्या विभागांमध्ये ही मालमत्ता गोठण्याचे काम केले गेले आहे. प्रक्रिया जरीही पार पडली गेली असली तरीही मालमत्ता गोठवण्याचा प्रस्ताव दिल्याचे आजच्या रिपोर्टमध्ये देण्यात आला आहे. याशिवाय एसीबीनेही महाराष्ट्रामध्ये जानेवारी महिन्यातील 21 दिवसांमध्ये 41 गुन्ह्यांमध्ये 60 आरोपींना अटक केलेली आहे. यासोबतच अपसंपदा आणि अन्य भ्रष्टाचाराचा एकही गुन्हा घडलेला नाही. 2024 मध्येही नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वाधिक लाचखोरीचे प्रमाण घडले होते. नाशिक विभागामध्ये 151, पुणे 135, छत्रपती संभाजीनगर 111 अशा प्रकरणांची नोंद करण्यात आलेली आहे. इतरत्र विभागांच्या तुलनेमध्ये हा आकडा सर्वाधिक आहे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Feb 24, 2026 3:14 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Nashik Crime: 21 दिवसात 26 जणांना अटक, 'हे' आहे महाराष्ट्रातील सर्वात लाचखोर शहर









