Kolhapur News: सासऱ्याच्या निवडणुकीने घेतला सुनेचा जीव! १० लाखांसाठी छळ, कोल्हापूर हादरलं

Last Updated:

Kolhapur News : सासऱ्याच्या प्रचारासाठी माहेरुन पैसे आण, यासाठी सुरू असलेल्या छळामुळे एका महिलेने टोकाचे पाऊल उचललं.

सासऱ्याच्या निवडणुकीने घेतला सुनेचा जीव! १० लाखांसाठी छळ, कोल्हापूर हादरलं (AI Image)
सासऱ्याच्या निवडणुकीने घेतला सुनेचा जीव! १० लाखांसाठी छळ, कोल्हापूर हादरलं (AI Image)
कोल्हापूर: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. नगर परिषद, नगर पंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडाला आहे. मात्र, लोकशाहीसाठी महत्त्वाच्या असलेल्या उत्सवात एका सुनेला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सासऱ्याच्या प्रचारासाठी माहेरुन पैसे आण, यासाठी सुरू असलेल्या छळामुळे एका महिलेने टोकाचे पाऊल उचललं.
सासऱ्याच्या निवडणुकीच्या खर्चासाठी माहेरहून तब्बल दहा लाख रुपये आणावेत, या सततच्या तगाद्यामुळे एका विवाहितेने आत्महत्या केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण कुरुंदवाड शहरात खळबळ उडाली आहे. कौसर गरगरे (वय २७) हिने २० नोव्हेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या मृत्यूनंतर उघड झालेल्या घटनाक्रमानं दोन्ही कुटुंबांमध्ये तणाव वाढला आहे.
advertisement
कौसरच्या कुटुंबीयांनी सुरुवातीपासूनच या आत्महत्येमागे संशय व्यक्त केला होता. मृतदेह स्वीकारण्यास त्यांनी नकार देत पोलिसांकडून सखोल चौकशीची मागणी केली. त्यानंतर कौसरचा भाऊ अलताफ आवटी (रा. जयसिंगपूर) यांनी कुरुंदवाड पोलिसात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार, कौसरवर तिचे पती इंजमाम राजमहंमद गरगरे (वय ३१), सासू मुमताज गरगरे, सासरे राजमहंमद गरगरे आणि जाऊ समिना इलहान गरगरे (वय २८) यांनी सातत्याने शारीरिक व मानसिक छळ केला.
advertisement
तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, कौसरवर तिच्या पतीच्या व्यवसायासाठी तसेच सासऱ्याच्या निवडणूक खर्चासाठी दहा लाख रुपये आणण्यासाठी प्रचंड दबाव टाकण्यात आला. पैशांसाठी चाललेल्या या तगाद्यातूनच तिच्यावर अत्याचार वाढले आणि या सततच्या छळाला कंटाळून कौसरने आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
या प्रकरणातील दोन आरोपी कौसरचा पती इंजमाम गरगरे आणि जाऊ समिना गरगरे यांना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, सासू आणि सासऱ्याची अद्याप अटक झालेली नाही. पोलीस त्यांची भूमिका आणि सहभाग तपासत आहेत.
advertisement
कुरुंदवाडमध्ये या घटनेमुळे संतापाची भावना पसरली असून महिलांवरील अत्याचार आणि हुंडाबळीच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा चर्चेला ऊत आला आहे. पोलीस पुढील तपास वेगाने सुरू असून कौसरला न्याय मिळावा, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Kolhapur News: सासऱ्याच्या निवडणुकीने घेतला सुनेचा जीव! १० लाखांसाठी छळ, कोल्हापूर हादरलं
Next Article
advertisement
Raj Thackeray MNS: 'राज ठाकरे मेरा XXX,  इधर कोई मराठी आया तो उसकी...', ठाण्यात मद्यपी परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
'राज ठाकरे मेरा XXX, कोई मराठी आया तो उसकी...', ठाण्यात परप्रांतीयांचा धिंगाणा
  • 'राज ठाकरे मेरा XXX, इधर कोई मराठी आया तो उसकी...', ठाण्यात मद्यपी परप्रांतीय तर

  • 'राज ठाकरे मेरा XXX, इधर कोई मराठी आया तो उसकी...', ठाण्यात मद्यपी परप्रांतीय तर

  • 'राज ठाकरे मेरा XXX, इधर कोई मराठी आया तो उसकी...', ठाण्यात मद्यपी परप्रांतीय तर

View All
advertisement