सांगोल्याच्या राजकारणात नवे वळण, भाजपासोबत शहाजीबापूंची हातमिळवणी; निकालापूर्वीच उधळला गुलाल
- Published by:Prachi Amale
- Reported by:Virendrasigh Utpat
Last Updated:
भाजपावर उद्विग्न झालेले शहाजीबापू पाटीलही भाजपचे गोडवे गात युती कायम आहे असे सांगत होते.
सोलापूर : सांगोल्याच्या राजकारणात आज एक नवे वळण पाहायला मिळाला. नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारात एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले भाजप आणि शिवसेनेचे नेते आज एकत्र पाहायला मिळाले. विशेष म्हणजे भाजपावर उद्विग्न झालेले शहाजीबापू पाटीलही भाजपचे गोडवे गात युती कायम आहे असे सांगत होते.
सांगोल्यात 20 तारखेला मतदान होणार नसून 21 तारखेच्या निकालाकडेच तालुक्याचे लक्ष लागले आहे. सांगोला नगरपालिका निवडणुकीत शहाजी बापूंना भाजप आणि शेकापने एकटे पाडल्यानंतर येथे शिवसेना शिंदे सेना आणि भाजपमध्ये जोरदार लढत झाली होती. मात्र, उर्वरित दोन जागांसाठी पुन्हा भाजप आणि शिवसेना एकत्र आल्याने दोन्ही जागा बिनविरोध विजयी झाल्या आहेत. सांगोल्यातील प्रभाग क्रमांक एक मधून शिवसेनेच्या राणी माने तर प्रभाग क्रमांक 11 मधून सुजाता केदार या आज बिनविरोध नगरसेविका झाल्या.
advertisement
सांगोल्याचे राजकारण निवडणुकीनंतर नव्या वळणावर
न्यायालयीन प्रक्रियेमुळे या दोन प्रभागांची निवडणूक 20 डिसेंबरला होणार होती. मात्र या दोन्ही प्रभाग हे भाजप आणि शिवसेनेने एकत्र येऊन बिनविरोध केले. यानंतर या दोन्ही नेत्यांनी एकत्रित गुलाल खेळला. एकमेकांच्या विरोधात उभा राहिलेले नगराध्यक्षपदाचे उमेदवारही एकत्रित गुलाल खेळताना दिसून आले. त्यामुळे सांगोल्याचे राजकारण निवडणुकीनंतर नव्या वळणावर आले आहे.
advertisement
राजकीय वर्तुळात खळबळ
मागील काही दिवसांपासून शहाजी बापू पाटील हे भाजप विरोधी भूमिका घेत होते. भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर त्यांच्या कार्यालयाची एलसीबी पथक आणि निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून तपासणी करण्यात आली होती. या कारवाई दरम्यान कार्यालयाची झाडाझडती घेण्यात आली असून संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले होते. अधिकाऱ्यांनी कार्यालयातील उपस्थितांना बाहेर जाण्यास मज्जाव केला होता. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याची चर्चा होती. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती, प्रशासनाकडून अधिक तपास सुरू आहे.
view commentsLocation :
Pandharpur,Aurangabad,Maharashtra
First Published :
December 10, 2025 7:35 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सांगोल्याच्या राजकारणात नवे वळण, भाजपासोबत शहाजीबापूंची हातमिळवणी; निकालापूर्वीच उधळला गुलाल









