Buldana: बायोडिझेल पंपाच्या टाक्यात गुदमरून 2 तरुणांचा मृत्यू, बुलडाण्यातील घटना
- Published by:Sachin S
Last Updated:
मलकापूर नांदुरा दरम्यान नायगाव फाट्यावर ही घटना घडली. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील नायगांव फाट्याजवळील बायोडिझेल पंपाच्या टाक्या आहे
राहुल खंडारे, प्रतिनिधी
बुलडाणा : बुलडाण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बायोडिझेल पंपाच्या टाक्यात गुदमरून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर नांदुरा दरम्यान नायगाव फाट्यावर ही घटना घडली. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील नायगांव फाट्याजवळील बायोडिझेल पंपाच्या टाक्या आहे. टाकी साफ करण्याचं काम सुरू होतं. साजीद खान जलील खान, मुस्ताक खान जब्बार खान आणि आरिफ खान बशीर खान हे टाकी साफ करण्यासाठी उतरले होते. पण अचानक श्वास गुदमरायला लागला. त्यामुळे घटनास्थळावर साजीद खान जलील खान आणि मुस्ताक खान जब्बार खान या दोघांचा मृत्यू झाला. तर आरिफ खान बशीर खान हा गंभीर जखमी झाला.
advertisement
घटनेची माहिती मिळताच इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी आरिफ खानला तातडीने नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं असून उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं.
हे तिघेही मलकापूर येथील पारपेठ प्रभागातील रहिवासी आहेत. बायो डीझल पंपावर अपघात घडल्याची माहिती मृतकांच्या नातेवाईकांना देण्यात आली. तर दुर्घटना कसी घडला याबाबत पोलीस अधिकचा तपास करत आहेत.
Location :
Buldana,Maharashtra
First Published :
September 26, 2025 4:34 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Buldana: बायोडिझेल पंपाच्या टाक्यात गुदमरून 2 तरुणांचा मृत्यू, बुलडाण्यातील घटना