'मी रक्ताच्या थारोळ्यात पडलो होतो अन्...', चाकू हल्ल्यावर पहिल्यांदाच बोलला सैफ अली खान, सांगितलं नेमकं काय घडलं?

Last Updated:
Saif Ali Khan attack : सैफ अली खानने एका मुलाखतीत त्याच्यासोबत घडलेल्या धक्कादायक घटनेबद्दल एक मोठा खुलासा केला आहे, ज्यामुळे सगळेच थक्क झाले आहेत.
1/8
मुंबई: बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान त्याच्या शांत आणि रॉयल स्वभावासाठी ओळखला जातो. पण, या वर्षाच्या सुरुवातीला त्याच्यासोबत त्याच्याच घरात एक धक्कादायक आणि भयावह घटना घडली होती.

advertisement
2/8
एका चोराने त्याच्या मुंबईतील घरात घुसून त्याच्यावर चाकूने हल्ला केला होता. या घटनेबद्दल सैफने आता एक मोठा खुलासा केला आहे, ज्यामुळे सगळेच थक्क झाले आहेत.

3/8
सैफ अली खानने एस्क्वायर इंडियाला एका मुलाखतीत सांगितलं की, जेव्हा हा हल्ला झाला, तेव्हा त्याचे दोन्ही लहान मुलं, तैमूर आणि जेह घरात होते. सैफ जेहच्या खोलीत जमिनीवर जखमी अवस्थेत पडला होता.

4/8
तो म्हणाला, “ती खूपच भीतीदायक भावना होती. मी जखमी अवस्थेत पडलो होतो, तेव्हा माझ्या डोळ्यासमोर माझं पूर्ण आयुष्य फ्लॅशबॅकसारखं फिरू लागलं होतं. मला वाटलं, आयुष्य किती सुंदर आहे! मला अनेक ठिकाणी फिरायला मिळालं, खूप चांगल्या आठवणी आहेत. माझी पत्नी, माझी मुलं... या सगळ्याबद्दल मी विचार करत होतो.”

5/8
सैफने ही घटना एक चमत्कार असल्याचं म्हटलं आहे, कारण त्याला जास्त मोठी दुखापत झाली नाही.

6/8
या हल्ल्यानंतर सैफने त्याच्या सुरक्षेत मोठी वाढ केली आहे. तो म्हणाला, “मला कधीच सिक्युरिटी आवडली नाही, पण आता काही काळासाठी ती ठेवावीच लागेल. या घटनेतून मी एकच गोष्ट शिकलो की, नेहमी आपले दरवाजे बंद ठेवा आणि सावध राहा.”

7/8
भावूक होत सैफ म्हणाला, “माझी जाण्याची वेळ अजून आली नव्हती. देवाने मला आणखी काही चांगल्या चित्रपटांमध्ये काम करण्याची, कुटुंबासोबत वेळ घालवण्याची आणि काही दानधर्म करण्याची संधी दिली आहे.” दरम्यान, सैफवर हल्ला केल्याप्रकरणी, मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

8/8
कामाबाबत बोलायचं झालं तर, सैफ अली खानचा शेवटचा ‘ज्वेल थीफ: द हीस्ट बिगिन्स’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता.

'मी वन-नाईट स्टँडसाठी तयार..', 50 वर्षांची बोल्ड अभिनेत्री, 'या' अभिनेत्यासाठी वेडी
'मी वन-नाईट स्टँडसाठी तयार..', 50 वर्षांची बोल्ड अभिनेत्री असं का म्हणाली?
    View All
    advertisement