Success Story : व्यवसायासाठी धाडस दाखवलं, नोकरी सोडून सुरू केलं मधमाशी पालन, वर्षाला लाखात कमाई
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
नोकरीपेक्षा स्वतःचा व्यवसाय करावा, असा विचार मनात आल्याने त्यांनी 2018-19 मध्ये मधमाशी पालनाचा प्रवास सुरू केला. मोठा भाऊ सचिन नंदकिशोर येणूरकर यांच्या मार्गदर्शनातून आणि पाठबळातून या व्यवसायाची प्रेरणा मिळाली.
advertisement
परंतु नोकरीपेक्षा स्वतःचा व्यवसाय करावा, असा विचार मनात आल्याने त्यांनी 2018-19 मध्ये मधमाशी पालनाचा प्रवास सुरू केला. मोठा भाऊ सचिन नंदकिशोर येणूरकर यांच्या मार्गदर्शनातून आणि पाठबळातून या व्यवसायाची प्रेरणा मिळाली. पुण्यात सात दिवसांचे प्रशिक्षण घेतल्यानंतर कृषी संमेलनातून 8 बॉक्स घेऊन या प्रवासाची सुरुवात झाली.
advertisement
शुभम यांनी 2 लाख रुपयांच्या बचतीतून 40 बॉक्स घेतले. यात 1.5 लाख रुपये बॉक्स खरेदीसाठी तर उर्वरित 50 हजार रुपये व्यवसाय सुरू करण्यासाठी वापरले. काही प्रमाणात मोठ्या भावाचा आर्थिक आधारही मिळाला. परंतु सुरुवातीला नॉलेज कमी असल्याने पुस्तकातून शिकलेल्या गोष्टी प्रत्यक्षात उपयोगी पडत नव्हत्या. त्यामुळे त्यांनी स्वतः अनेक ठिकाणी विनामोबदला काम करून प्रत्यक्ष अनुभव घेतला.
advertisement
पावसाळ्यात टेंटमध्ये राहणे, साप-कोल्ह्यांचा त्रास, मधमाशांचा दंश सहन करून ग्राहकांना समजावून घेणे अशा अनेक संकटांना तोंड देत त्यांनी व्यवसाय सुरू ठेवला. दिंडोरी (म.प्र.) ते ललितपूर या प्रवासादरम्यान झालेल्या अपघातात मित्राचा मृत्यूही डोळ्यासमोर पाहिला. तरीही खचून न जाता त्यांनी या व्यवसायात आपली वाटचाल सुरू ठेवली.
advertisement
advertisement
advertisement
आज शुभम यांनी पाच लोकांना रोजगार दिला आहे. विक्रीसाठी अमूल यांसारख्या मोठ्या कंपन्यांबरोबरच स्वतःचा The Hive Honey हा ब्रँड त्यांनी उभा केला आहे. मॉल, मेडिकल, तसेच विविध प्रदर्शन आणि स्टॉलच्या माध्यमातून थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवले जात आहे. 2021 मध्ये त्यांनी नंतवर्षा अपियरी नावाने स्वतःचा मधमाशी फार्म सुरू केला आणि The Hive Honey या ब्रँडची स्थापना केली. आज या ब्रँडची बाजारपेठेत खास ओळख निर्माण झाली आहे.