Anganwadi Workers Diwali Bonus : अंगणवाडी ताईंना सरकारची "भाऊबीज भेट", अंगणवाडी सेविकांना सरकारकडून बोनस जाहीर

Last Updated:

Anganwadi Workers Diwali Bonus : अलीकडेच रेल्वेनेही आणि म्हाडानेही आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर केला असताना आता महिला- बालविकास विभागानेही एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनाही आता दिवाळी बोनस जाहीर केला आहे.

News18
News18
राज्य सरकारने महिला- बालविकास विभागामार्फत यंदाच्या दिवाळीमध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना दिवाळी बोनस जाहीर केला आहे. दिवाळीला अवघेकाही दिवसच शिल्लक राहिलेले असताना राज्य सरकार आणि केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना स्पेशल दिवाळी गिफ्ट म्हणून बोनस देताना दिसत आहे. अलीकडेच रेल्वेनेही आणि म्हाडानेही आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर केला असताना आता महिला- बालविकास विभागानेही एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना दोन हजार रूपये इतका दिवाळी बोनस जाहीर केला आहे.
दिवाळीनिमित्त सरकारकडून सर्व अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीसांना भाऊबीज भेट देण्यात येणार आहे. प्रत्येकी दोन हजार रूपये इतके शासनाने दिवाळी बोनस म्हणून देण्यास मान्यता दिली आहे. यासाठी एकूण ४०.६१ कोटी रुपयांचा निधी शासनाने उपलब्ध करून दिला आहे. तसा शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी त्यांच्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरून दिली आहे. सर्व अंगणवाडी सेविकांसाठी ही आनंदाची बातमी म्हणता येईल. दिवाळी बोनसमुळे राज्यभरातील हजारो अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांमध्ये आनंदाचा आनंद निर्माण होईल आणि त्यांचा दिवाळीचा उत्सव अधिक उजळ होईल, असे मंत्र्यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
advertisement
मंत्री आदिती तटकरे यांनी, "अंगणवाडी ताईंना "भाऊबीज भेट"! महाराष्ट्रातील बालकांच्या पोषणासाठी, महिलांच्या आरोग्यासाठी राबवण्यात येणार्‍या विविध योजना यशस्वीरित्या अंमलात आणण्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस अतिशय समर्पित भावनेने सेवा देतात. या निस्सीम सेवेप्रती आदर व्यक्त करत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीसांना "भाऊबीज भेट" देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, यासाठी प्रत्येकी २००० रुपये याप्रमाणे एकूण ४०.६१ कोटी रुपये निधी तत्काळ मंजूर करण्यात आला आहे.", असं शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलेले आहे. दिवाळी बोनसची ही रक्कम लवकरच आयसीडीएस आयुक्तांमार्फत अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीसांना वितरित केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
advertisement
दरम्यान, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या महिला- बालकांच्या संगोपनासाठी, पोषणासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाची सेवा बजावत असतात. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ही भाऊबीजेची रक्कम भेट स्वरूपात मंजूर केली आहे. प्रत्येक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ही आपल्या समाजातील खरी ‘शक्ती' असून, त्यांचा सण आनंदी व्हावा हीच आमची भूमिका आहे असं यावेळी आदित तटकरे यांनी सांगितले आहे. अंगणवाडी सेविक या खऱ्या अर्थाने फिल्डवर काम करत असतात. त्यांची मेहनतीची दखल वेळोवेळी सरकारकडून घेतली जाते, खऱ्या अर्थाने त्यांची यंदाची दिवाळी गोड होणार आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Anganwadi Workers Diwali Bonus : अंगणवाडी ताईंना सरकारची "भाऊबीज भेट", अंगणवाडी सेविकांना सरकारकडून बोनस जाहीर
Next Article
advertisement
'मी वन-नाईट स्टँडसाठी तयार..', 50 वर्षांची बोल्ड अभिनेत्री, 'या' अभिनेत्यासाठी वेडी
'मी वन-नाईट स्टँडसाठी तयार..', 50 वर्षांची बोल्ड अभिनेत्री असं का म्हणाली?
    View All
    advertisement