Central Railway Megablock : मध्य रेल्वेवर 15 दिवसांचा मेगा ब्लॉक; या मार्गावरील लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांवर होणार परिणाम
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
Karjat Railway Station Megablock : मध्य रेल्वेवरील कर्जत स्थानकावर कर्जत यार्ड रिमॉडेलिंगच्या कामाची पूर्वतयारी करण्यासाठी पुढच्या पंधरा दिवसांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मार्गावरील चाकरमान्यांचे विशेष मेगाब्लॉकच्या काळात मोठ्या प्रमाणावर हाल होणार आहेत.
कर्जत आणि खोपोली दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेवरील कर्जत स्थानकावर कर्जत यार्ड रिमॉडेलिंगच्या कामाची पूर्वतयारी करण्यासाठी पुढच्या पंधरा दिवसांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मार्गावरील चाकरमान्यांचे विशेष मेगाब्लॉकच्या काळात मोठ्या प्रमाणावर हाल होणार आहेत. मध्य रेल्वेने 26 सप्टेंबरपासून 15 दिवसांसाठी पायाभूत सुविधांची देखभाल आणि सिक्युरिटीसाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक जाहीर केला आहे. या काळामध्ये, कर्जत स्थानकावर यार्ड रिमॉडेलिंगच्या प्रकल्पासंबंधित 'प्री नॉन-इंटरलॉकिंग (PNI)'ची कामे हाती घेतली जाणार आहेत.
कर्जत स्थानकावरील पंधरा दिवसांच्या मेगाब्लॉकच्या काळामध्ये, मुंबई लोकलसोबत लांबपल्ल्याच्या एक्सप्रेस सेवेवरही परिणाम होईल. परिणामी या काळामध्ये कर्जत ते खोपोली लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्जत रेल्वे स्थानकावर देखभालीसाठी मेगाब्लॉक अत्यावश्यक आहे. मेगाब्लॉकच्या काळामध्ये कर्जत- खोपोली मार्गावरील प्रवाशांनी होणार्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 27 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या काळामध्ये, हा विशेष मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.
advertisement
27 सप्टेंबर (शनिवार) ते 30 सप्टेंबर (मंगळवार) या दिवसांमध्ये सकाळी 11:20 ते सायंकाळी 04:20 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. अप आणि डाउन पनवेल मार्गावर नांगणाथ केबिन आणि कर्जत प्लॅटफॉर्म 2 व 3 दरम्यान, तसेच कर्जत प्लॅटफॉर्म 3 आणि चौक स्टेशन दरम्यान रेल्वे वाहतुकीवर परिणाम होईल. या ब्लॉकच्या कालावधीत कर्जत आणि खोपोली दरम्यान अप आणि डाउन मार्गावर कोणतीही लोकल ट्रेन सेवा उपलब्ध नसेल. कर्जत स्थानकावरू दुपारी 12, 1:15 आणि 3:39 वाजता सुटणाऱ्या कर्जत- खोपोली मार्गावरील लोकल रद्द करण्यात आलेल्या आहेत. तर, खोपोली येथून सकाळी 11:20 वाजता आणि दुपारी 12:40 आणि 2:55 वाजता सुटणाऱ्या खोपोली- कर्जत लोकलही रद्द करण्यात आलेल्या आहेत.
advertisement
दरम्यान, मेगाब्लॉकच्या काळामध्ये दुपारी 12:20 वाजता CSMT स्थानकावरून सुटणारी CSMT- खोपोली लोकल कर्जत स्थानकापर्यंतच शॉर्ट टर्मिनेट चालवण्यात येणार आहे. ती लोकल खोपोली स्थानकापर्यंत जाणार नाही. तर, दुपारी 01:48 वाजता खोपोली स्थानकावरून सुटणारी खोपोली- CSMT लोकल कर्जत स्थानकावरूनच सुटेल. मेगाब्लॉकच्या काळात लोकल खोपोली स्थानकापर्यंत न जात असल्यामुळे लोकल कर्जत स्थानकावरूनच सुटेल. दरम्यान, कर्जत स्थानकावरून दुपारी 12:00 आणि 1:15 वाजता सुटणारी कर्जत- खोपोली लोकलही 30 सप्टेंबर रोजी म्हणजेच मंगळवारी रद्द करण्यात आली आहे. तर, खोपोली स्थानकावरून सकाळी 11:20 आणि दुपारी 12:40 वाजता सुटणारी खोपोली- कर्जत लोकलही रद्द करण्यात आली आहे.
advertisement
फक्त लोकलच नाही तर, लांब पल्ल्याच्या लोकलवरही कर्जत स्थानकावरील मेगाब्लॉकचा परिणाम होणार आहे. रविवारी अर्थात 28 सप्टेंबर रोजी धावणारी ट्रेन क्रमांक 22194 ग्वाल्हेर- दौंड एक्स्प्रेस ही कल्याण-कर्जत मार्गे वळवण्यात येईल आणि पनवेल येथून चढणाऱ्या प्रवाशांसाठी ती कल्याण स्थानकावर थांबवण्यात येणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 26, 2025 1:22 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Central Railway Megablock : मध्य रेल्वेवर 15 दिवसांचा मेगा ब्लॉक; या मार्गावरील लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांवर होणार परिणाम